पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० ' साक्षात्परिचय ' ण्यांचे उत्तम कुटुंबीयांप्रमाणे स्वागत करणारा - ज्ञानाचा भोक्ता, राजकारणाचा अध्येता, नागरिकत्वांतील कर्ता, दनिजनांचा त्राता - निराशी, अनिद्र, निर्विषय व निरपेक्ष - संसारांत विरागी व वैराग्यानें संसार करणारा - असा पुण्यात्मा पुन्हा कधीं होईल का बोला ! खरोखर, अण्णासाहेबांच्या पवित्र जवनाची आठवण झाली म्हणजे मन कृतार्थ होतें, सद्भावना उसळतात, शरीर पुलकित होतें, हृदय आनंदाने भरून जातें व पुणे शहराची पुण्याई जर कोणती असेल तर तो हाच सत्पुरुष असे वाटायला लागतें. " काढला खरोखर ह्या पुरुषानें जर स्वतःला साधु म्हणवून घेतलें असतें--शिष्य जवळ गोळा केले असते – मठ असता ·-- रामराम, रामराम, रामराम, असे म्हणून लोकांचें लक्ष्य वेधलें असतें-- गबाळी पोषाख केला असता- डोक्याला भगवें गुण्डाळलें असतें--कफनी घातली असती--मंत्रोपदेश दिले असते-हारतुरे घेतले असते- पाद्योपचार स्वीकारले असते-खडावा बाज विल्या असत्या - चिपळ्या झिजविल्या असत्या - फोटो काढविले असते-चरित्रें लिहविली असती स्तोत्रे गावविली असती--मंदिरें बांधविली असती तर आज ह्या पुरुषाचा केवढा जयजयकार झाला असता ! निदान महाराष्ट्रांत जन्म न घेतां जर बंगाल, मद्रास किंवा पंजाब येथें त्यानें जन्म घेतला असता तर आज त्याचें केवढे कौतुक झालें असतें ! निदान हा थिऑसफिस्ट असता तर आज त्याचें केवढे प्रस्थ माजलें असतें ! पण आत्मप्रौढीचा त्यास पूर्ण कंटाळा- आत्मस्तुतीचा पूर्ण तिटकारा - आत्मगौरवाचा पूर्ण - पूर्ण - किळस - त्यामुळे त्याचे- वर मोर्चे उडविली गेली नाहींत त्याची प्रतिष्ठा वाढली नाहीं - त्याची मंदिरें बांधली गेली नाहीत किंवा त्याची चरितेंही लिहिली गेलीं नाहींत !

पण खरोखर अण्णासाहेब पटवर्धनांचें चरित्र इतकें पवित्र होतें कीं तें पाहून रामशास्त्रयांच्या निःस्पृहतेची आठवण होई - एकनाथाच्या विरक्त संसाराची आठवण होई - तुकारामाच्या कामिनीकनकाविषयींची निर्लोभिता डोळ्यांपुढे येई— कबीराचा परोपकारीपणा आढळे - नामदेवाची प्रेमप्रवृत्ती दिसावयाला लागे ! रामकृष्ण परमहंसांची शान्तता – विवेकानंदांची बुद्धिमत्ता व श्रीरामतीर्थांची तेजस्विता अण्णासाहेबांचे चरित्रांत बघायला सांपडे! अण्णा-