पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुत्रप्राप्तीसाठी जनकीबाईची तपश्चर्या. कल्पनेप्रमाणे मुलगा झाला. परंतु हा आनंद फार दिवस टिकावयाचा नव्हता. थोडे दिवस गेल्यावर एके दिवशीं माध्यान्हीचे सुमारास मुलाला न्हाऊं वगैरे घालून देवापुढे पाळण्यांत निजवून त्या प्रदक्षिणा घालीत होत्या. एकाएकी मूल दचकून उठले आणि त्यानें एक लहानशी किंकाळी फोडली. जानकीबाई घावया घावऱ्या जवळ येऊन पाहतात तों पोराचा प्राण निघून गेलेला ! या प्रकारामुळे त्यांना अत्यंतच खेद झाला. असे सांगतात कीं, या मुलावर कोणी तरी दुष्ट मंत्रप्रयोग करीत होता. त्याचा तो परिणाम होऊन गेला. कोण प्रयोग करीत होतें तें जानकीबाईस ठाऊक होतें. मुलाचा प्राण गेला तेव्हां तो प्रयोग उलटून देतों, म्हणून म्हणणारा एक माणूसही त्यांना मिळाला होता; परंतु तसें करण्यानें त्या प्रयोग करणा-याचा मृत्यु ओढवणार होता, म्हणून त्यांनी त्या माणसास सम्मति दिली नाहीं. श्रीअण्णासाहेब यांच्या मातृपदाचा मान ज्यांना मिळावयाचा होता, त्यांचे ठिकाणी असले थोरपण असणें योग्यच होतें. आघात झाला म्हणून कमर खचून हातांतला उद्योग सोडून देणें त्यांना ठाऊकच नव्हते, उलट त्यायोगें त्यांना दुप्पट अवसान मात्र आलें. कोणच्याही मंत्रतंत्रांना भीक न घालणारें सर्वांत श्रेष्ठ असें जें आदिशक्ति परमेश्वराच्या कृपेचें सामर्थ्य, तेंच प्रत्यक्ष अंगीं आल्याखेरीज काम भागणार नाही, अशी त्यांच्या मनाची खात्री झाली. सुदैवाने त्यांना एक मार्गदर्शक गुरूही भेटला. पटवर्धनांचें कुळदैवत गजानन आहे. त्याची उपासना त्यांनी समजून घेतली, व देहावर उदार होऊन त्याची सेवा त्या करूं लागल्या. दिवसाचा पुष्कळ भाग त्यांचा जपध्यानादिकांतच जात असे. याप्रमाणे नित्यनेम सारून त्या दर्शनाकरितां देवळांत जात व तेथें बराच वेळ प्रदक्षिणा घालून परत येत. हाच क्रम पुढे श्रीअण्णासाहेवांनींही उचलला होता, आणि बहुतकरून अखेर पर्यंत अव्याहत चालला होता. पुण्यास जो अनेक देवस्थानें आहेत, त्या सर्वांत श्री ओंकारेश्वरप्रभु, श्री गुंडगणपती, आणि भिकारदासाचे गेटाजवळील श्रीमारुतिराय ही मोठी जागृत स्थानें आहेत, असें म्हणतात. श्रीअण्णासाहेब यांचे त्यांचेवर मोठे प्रेम असे. यांतील श्री गुंडगणपतीवर जानकीबाईंची फार श्रद्धा होती. नाना चित्राव म्हणून एक भव्य व तेजस्वी वृद्ध गृहस्थ त्याचे पुजारी होते. त्यांना