पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाल्य. साहेब यांचे ठिकाणी झळकणारें राजतेज आणि राजपुरुषासच साध्य असला त्यांचा जीवनक्रम आणि श्रेष्ठ उद्योग याचें तरी कारण हेच आहे. पेशवाईच्या गतवैभवाची चित्रे डोळ्यापुढे असणारे, आणि त्याच्या पुनरा वर्तनाचीं नित्य नवीं स्वप्ने पाहणारेही कांहीं मायेचे पूत त्यावेळी पुण्यांत होतेच. असल्या लोकांशीं तर भाऊसाहेबांचे विशेष सख्य असे. आपल्या निराश झालेल्या अंतःकरणास घटकाभर करमणुक व्हावी म्हणून अशी मंडळी नेहमी गप्पा मारण्याकरितां भाऊसाहेब यांचेकडे येत. यांच्या सहवासांतच अण्णासा- हेबांचें बाळपण गेलें. त्या सर्वांचें योग्य तें परिवर्तन बालरूपधर विनायकाचे अंतःकरणांत होणें साहजिक होतें; आणि तें किती कमालीच्या उत्कटतेनें झालें, हैं अगदी शेवटशेवटच्या त्रिगुणातीत स्थितींतही, अण्णासाहेब हे त्या वेळच्या आठवणी सांगतांना, किती रंगून गेल्यासारखे दिसत, तें पाहिलें म्हणजे ध्यानांत येई. खर्ज्याच्या लढाईत गाडा मोडला असतां स्वतःच्या पाठीवरूनच तोफ सोडणारे अमृतराव जाखडे, व तरवारीच्या सफाईदार हातासरसे केळीच्या खुंटांतील बोटभर जाडीचा गज बेमालुमपणानें दुखंड करणारे, आणि मांडीच्या सांगडींत अण्णासाहेब व नानासाहेब या बालमूर्तींना बसवून हातांवर उलटेच चालून शनवारवाड्यास फेरी करणारे माधवराव सोमवंशी वगैरेंची वर्णनें विनोदी रीतीनें सांगतांना ' सांगावेसेंच वाटतें रे !' असें त्यांना होऊन जाई । नेहमींच्या नियमाप्रमाणें भाऊसाहेबांच्या ऐश्वर्यांतही एक कमीपणा होता. मुली झाल्या होत्या परंतु पोटीं पुत्रसंतान नव्हतें. या गोष्टीचें त्यांचेपेक्षां जानकीबाईसच जास्त वाईट वाटे. परंतु नुसतें वाईट वाटलें म्हणून स्वस्थ बसणारी आणि जागच्याजागीं हळहळणारी ती बाई नव्हती. ही आपली आपत्ती दूर करण्याचा तिनें निश्चय केला, आणि त्या काळच्या समजुतीला अनुरूप अशा तपादिक कडक उपायांनी आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठीं त्यांनी कास बांधली. त्यांची श्रद्धा आणि दृढनिश्चय अंबेसारखीं बिन- तोड होतीं. शेवटीं अनेक व्रतवैकल्यांचें फळ म्हणून म्हणा, किंवा पुढे पोर्टी येणाऱ्या विनायकाला उचित अशी जास्त कडक तपस्या त्यांच्या हातून घडावी म्हणून त्यांना जरा डंवचावें म्हणून म्हणा, त्यांना गर्भ राहिला. त्याचें नीट रक्षण व्हावे म्हणून त्या कांही दिवसांनंतर कारकोळपुऱ्यांतील श्रीनृसिंहाचे देवळांत मुलीसुद्धां जाऊन राहिल्या होत्या. पूर्ण दिवस झाल्यावर त्यांना त्यांच्या