Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

J २३० साक्षात्परिचय प्रमाणे महाराजांच्या सांप्रदायाचा सर्व तऱ्हेने प्रपंच केला, आणि सर्व आयुष्यभर अशा तऱ्हेचे अनेक विरोधाभास करून, हे त्यांनी साधिलें; एका बाजूनें 'अंत- वहिश्च व्याप्य नारायणः स्थितः' अथवा 'नारायणः श्रीनृसिंहसद्गुरुदेव एव,' व ‘ इतरांचा देह भिन्नपणें कैसा । प्रत्यक्ष नयनीं देखतसे जैसा । मी आपुला मानितसें तैसा । परकीयत्वें.' अशा अन्वय व्यतिरेकांच्या अनुभवांची जागती ज्योत उजळीत असतां दुसरीकडून, एकाद्या 'धुंडिराज'पंताप्रमाणे तोंडावरून पांघरूण काढल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मीः ' असे करदर्शन घेऊन पर्वत- स्तनमंडला धरित्रीवर विनयानें ते पाऊल ठेवीत. व क्रमाक्रमानें महाराजांचे नांव घेणें, त्यांच्या तसविरीचें व हस्ताक्षराचें दर्शन घेणें, स्वतः रामनाम लिहून अक्षर काढणें, उघड्यावर जाऊन अनेक पुण्यनदी द पुण्यस्थलें व इतर पुण्य गोष्टी इत्यादिकांचें स्मरण करून, कलाकाष्टऋतुसंवत्सरादिघटित अशा महाराजांच्या काल स्वरूपाचें स्मरण करून, व तद्बोधक सूर्यचंद्रनक्षत्रादि आकाशस्थ ज्योतींचें दर्शन घेऊन, आणि देवघर, तुळसीवृंदावन व औदुंबर यांस प्रदक्षिणा घालून ते आपल्या दिवसास सुरुवात करीत. त्यानंतर कांहीं म्हणणें नाथभागवत, ज्ञानमोदक, स्वात्मसौख्य, इत्यादि ग्रंथांचे थोडें वाचन व नित्यपाठाचे अभंग वगैरे म्हणून शौचास जात. पुढे पुढे त्यांच्या मार्गे प्रचंड व्याप लागल्यामुळे हे सर्व याच क्रमानें होई, असें नाहीं. केव्हांतरी आर्गेमागें व थोड्याफार संक्षेपानें होई परंतु तें सारें स्वल्प प्रमाणांत का होईना करणे अगदी अखेरपर्यंत त्यांनी सोडलें नाहीं. 6 , 14 कोणचाही नियम कसा करावा व तो कसा पाळावा, हे त्यांच्यापासून शिकावें. नाथभागवत स्वात्मसौख्य ज्ञानमोदक वगैरे ग्रंथ त्यांच्या नित्यपाठांत होते, व वेळेनुसार ते सवंध अध्याय अथवा ग्रंथही वाचून घेत, तरी पण त्यांचा नित्य नियम निदान या ग्रंथांची एक ओवी तरी वाचावी असा होता. आणि शेवटी शेवटीं तर त्यांना तो शब्दशः तसा पाळावा लागला. स्वात्म- सुखाविषयों तर त्यांनी स्वतःच 'स्वात्मसौख्य ग्रंथस्य नित्यं एका ओवा वाच- नीया, इति कमे तद्दिनक्रमागत उपासना कांडस्य' वगैरे वगैरे लिहून ठेवलें आहे. अशा रीतीनें हैं सर्व आह्निक साधेल तसें उरकून ते शौचास जात.

  • गोविंदाग्रजांच्या 'भावबंधन' नाटकांतलें एक भाबडें पात्र.