पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांप्रदायिक अभिमानांतही राष्ट्रीयता. २२९ मला काय करावयाचें आहे ? ' असे त्यांनी कळकळीनें सांगितलेले आठवतें अशा रीतीनें एकदां त्यानें दीक्षा घेतली, की त्याच्या वीर्यप्रज्ञेस अनुसरून लागेल तें त्याला सांगण्याची त्यांची तयारी असे. महाराजांच्या सांप्रदायांत मनुष्य आला असतां तो आपल्या अत्यंत निकट आला असे त्यांना होऊन मोठा संतोष होई, हें खास. परंतु साधकानें याच सांप्रदायाची दीक्षा घेतली पाहिजे, असा प्रपंच त्यांच्या ठिकाणी नव्हता. त्यांच्या सर्वं खटाटोपीचा हेतु भारतवर्षीय म्हणजे हिंदु लोकांची 'वैदिक राष्ट्र' म्हणून सर्वांगसुंदर उन्नति व्हावी असा असल्यामुळे असा प्रपंच त्यांच्या मनांत येण्यास वावच नव्हता; उलट महाराजांची प्रार्थना करतांना, हा सांप्र- दायच तर काय परंतु ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, इत्यादि प्रचलित सिद्ध सांप्रदायांचें ऊर्जित व्हावे म्हणून, प्रार्थना केलेली पुष्कळ वेळां ऐकण्यांत आहे. राष्ट्राची उन्नति म्हटली म्हणजे ती सर्वांगांनीच झाली पाहिजे, व तिला सर्वांची गरज लागते. तेव्हां तिच्याकरितां तपस्या करणान्यास संकु- चितपणा ठेवून कसे चालेल ? असो. कोणच्याहि खन्या सांप्रदायाचा मनुष्य असला तर उलट त्याला 6 तुला उपदेश घेण्याची गरज नाही, ' असे सांगितलेले आम्हांस माहित आहे. उमरा- वती येथील सुप्रसिद्ध वकील प. वा. रा. रा. भाऊसाहेब असनारे यांच्या मनांत महाराजांच्या सांप्रदायाची दीक्षा घ्यावयाचें असतां, उलट ' तुला घेण्याची गरज नाहीं, पूर्वीच तुला मिळालेला आहे,' असे त्यांनी सांगितलेलें पुष्कळांस ठाऊक आहे, हा उपदेश त्यांना लहानपणीं १०/१२ वर्षांचे असतां कोणीं दिला होता. तो कोणी दिला हैहि त्यांच्या लक्षांत राहिले नव्हते; परंतु त्यांना जें काय करावयास सांगावयाचें तें तर त्यांनी सांगितलेच, पण 'उप- देश मात्र घेण्याची गरज नाहीं' म्हणून सांगितलें. वर ' खन्या सांप्रदायाचा' मनुष्य असे म्हणण्याचे कारण असे आहे की, कांही अर्वाचीन स्वयंसिद्ध संप्रदायप्रवर्तकांच्या उपदिष्टांना त्यांनी महाराजांच्या येथे दीक्षा घेण्यास अनुज्ञा दिली, हे होय. हें खरें खोटें निवडण्याचे काय शास्त्र होतें, ते त्यांचें त्यानांच ठाऊक. अशा रीतीनें एका रीतीनें त्यांनी सर्व कांही स्वतःच्या अंगाबाहेर ठेवून स्वतः सुटे राहून देवव्रत भीष्मांनी ज्याप्रमाणे तीन पिढ्या कौरव साम्राज्य चालविलें त्या-