पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवाजवळ मागावें. २२७ क्रम ते आपोआपच प्रगट होतात. मग साधकानें फक्त ठरावीक काम अवंचक- तेनें करावयाचें, एवढेच त्याचें काम राहतें. अशा सर्व कारणांनीच या पुढील भागाविषयों प्रश्न विचारून त्यांना उगीच सतावून सोडणान्या आमच्यासारख्या न कर्त्या परमार्थ्यांना सांप्रदायिक उपासना देववून चरकाला लावून देत, व " आम्ही या मार्गाने गेलेले आहोत, तुलाहि तेंच सांगितले, महाराजांवर विश्वास ठेवून करीत रहा, म्हणजे सर्व कांहीं हळू हळू घडून येईल. आज या गोष्टी तुला कळणें शक्य नाहीं, सांगितलेलें कर. ' ढुंगणावर पाणी घाल' को पाणी घालावें; लोंबतें काय, हे पाहण्याचें काय काम ! " असे अतिशय कळकळीने सांगत. आणि एवढ्याकरितां साथ- काच्या प्रयत्नाचें मूळ अधिष्ठानच अतिशय शुद्ध ठेवण्याचा ते प्रयत्न करीत. त्यांच्या अनुकरणानें निंबाचा पाला खाऊन दुग्धाहार करणारे, व आपणास कांहीं तरी प्रतीति यावी, म्हणून श्रीगुरुचरित्रावर झोड उडविणारे कोणी नव्हते असे नाही. त्यांनाही ते असेंच सांगत कीं ' बावारे, येथे कांही तमाशा नाही महाराजांची सेवा कर ( महाराज आणि देव हे त्यांच्या भाषेत पर्यायशब्द होते. परंतु देव ही कल्पना खरी. आळंदीचे स्वामी म्हणजेच देव समजा, असा त्यांचा अतिशय नव्हता. कोणीकडून तरी जग- नियंता, दयाज्ञानगुणसागर, भूतभव्यभवत्प्रभु असा देव आहे व तो सर्व करतो अशी भावना उत्पन्न करावी, एवढाच त्यांचा कटाक्ष असे. साधकास त्या भावनेची गरज आहे, त्या भावनेला धरून असणारे आकार या केवळ इमामच्या जूती' आहेत, असे ते काम पडल्यास उघड सांगत. ) कारण त्यांची सेवा करणें हें आपले काम आहे. ' ' मनुष्याला या जगामध्ये अनेक तऱ्हेच्या वासना पूर्ण करून घ्यावयाच्या असतात. त्या सर्व थोड्याबहुत पुरल्याच पाहिजेत, नुसत्या 'अरे मिथ्या रे अमिथ्या, टाक' असे वेदांतानें किर्ताही ओरडून सांगितले, तरी काम भागत नाहीं हें खरें आहे. व तितक्याच त्या वासना पुरणें आणि त्याहीपेक्षां कठीण म्हणजे, त्या पुरल्या असतांना त्यांचा उपशम होणें, हैं दोन्हीही मनुष्यप्रयत्नाच्या बाहेरचें आहे. परंतु त्या दोहोंचीही आवश्यकता आहे. म्हणून त्यानें ईश्वरी कृपेनें हें घडून येण्याची इच्छा करणें हें योग्यच आहे. तेव्हां, अपेक्षित गोष्ट मग ती कशीही असो, देवाजवळ मागणें यांत काहीही वाईट नाही. वर