पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ ' साक्षात्परिचय ' म्हणून जे पतंजलीने सांगितले, तें मनांत भरत नाही. ज्यामध्ये अशीं अष्टांगें पृथक् केलेली नाहीत अशा प्रकारचे इतर कांहीं मार्ग एकदम उत्तरांगास सुर- वात करतातसे वाटतें; त्यामुळे तर साधकाचा फारच बुद्धिभ्रंश होतो, वस्तुतः त्या मार्गांर्चाही खुबी अशीच असते की, जरी त्यांची सुरुवात एकदम उत्तरां- गापासून दिसते, तरी त्यांच्यातील अनुष्ठानाच्या विशिष्टपणामुळे नकळत जेव्हां ही पूर्वांगें साधतात, तेव्हांच खरोखर त्याच्या अभ्यासास सुरुवात होते. सर्वां- तील मूळ मुद्दा एक आहे, 'चित्तवालकाच्या' समजुतीकरितां ठिकठिकाणी फक्त मोड वेगळी आहे. तसेंच आणखीही एक कारण आहे. तें असें कीं कोणचीही गोष्ट अकल्पित रीतीनें घडून आली असतां मनावर जो नैसर्गिक परिणाम करते, तसा तिची अपेक्षा असतां घडून येत नाही. अर्थात् त्या परिणामाच्या योगानें सुखदुःखात्मक भोग आणि मानसिक सामर्थ्य अथवा, मनाला मिळणारें वळण, हें अपेक्षित प्रमाणांत हवें तसें जोरदार रीतीनें घडून येत नाहीं. म्हणूनच पूर्वाचार्यांची अशी पद्धत होती की, साधकाला फक्त मार्गावर सोडून द्यावयाचा, आणि तो तेथून घरंगळणार नाहीं, एवढ्या पुरती काळजी घ्यावयाची. बाकी त्यास कांही सांगावयाचे नाही. पुढचे अनुभव गुरूनें शिष्यास सांगून ठेवावयाचे नसून, शिष्यानें गुरूला सांगावयाचे आहेत; म्हणजे 'मला आतां असें असे होतें, व अमुक अनुभव येतो, हैं कसें काय ? ' असे शिष्यानें गुरूला सांगा. वयाचें व गुरूने अतिशय संतोषानें 'तूं आतां अमुक स्थितीपर्यंत आलास, या स्थितीमध्ये असें असें होत असतें, मला स्वतःला अथवा कोणा साधकाला असेच झालें होतें, व त्या वेळीं अथवा त्यानंतर त्यानें असें केलें' असें आपलें अंतरंग हळू हळू उघडे करावयाचें. आणि ही पद्धति सामान्य विचारसरणीला जरी पटली नाहीं, तरी अतिमानसशास्त्रास धरून आहे. सारांश, साधुसंतांच्या साधनकालाचा इतिहास मिळत नसल्यामुळे आपला मार्ग अडून राहिला आहे, अशी समजूत करून घेऊन आपल्या शिथिलसंवेगाचें समर्थन करणाऱ्यांचा फार मोठा वर्ग सांपडतो. परंतु त्यांचे खरोखर अडलेले असतें. पूर्वांगें उत्तम न घटावल्यामुळे एकदां योगपूर्वांगें उत्तम घटवून उत्तरांगास हात घातला म्हणजे तेथील अनुभवांची वेगळी खटपट करावी लागत नाहीं. यथा-