पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ साक्षात्परिचय ' बंगालच्या श्रीरामकृष्णांसारख्यांनी अगदी खुला बाजार करून सांगितलेल्या आहेत, त्यांचा जर नीट विचार केला, तर असे दिसून येतें कीं, या गोष्टी सांगण्यांत आणि लपवून ठेवण्यांतही कांहीं सुसंगतपणा आहे. सर्व साधन मार्गाचें जर निरीक्षण केले तर त्याचं साधारणतः तीन भाग पड तात. साधनांतील जो ' क्रियायोग' असतो त्याच्या आचरणाकारतां केलेले व सोसलेले कष्ट म्हणजे तप हा एक. दुसरा मनाचा चंचलपणा मोडून मल आणि विक्षेप हे दोष धुवून काढण्याचा केलेला खटाटोप, म्हणजे प्रत्याहार. आणि तिसरा, हाँ दोन्हीही अंगें निरलसपणे आचरीत असतां, जेव्हां जेव्हां हात टेकावयाचा प्रसंग येईल तेव्हां तेव्हां इंद्रियांतीत प्रदेशांतून त्यांना कसे साह्य झालें, व त्यांच्या विशिष्ट अभ्यासानें, अतींद्रिय विश्वाशी त्यांचे दळणवळण कसें कसे सुरू झालें, व हळू हळू तेथेंही त्यांनी वतनदारी कशी संपादन केली, म्हणजेच त्यांना देवी व अध्यात्मिक काय काय नुभव आले, हा होय. ८ आपले पूर्वकालीन साधुसंत, आणि रामकृष्णपरमहंसांच्या सारखे प्रचलित, यांनी सांगितलेल्या माहितीचा विचार केला तर असे दिसून येतें कीं, त्यांनी केलेले कायिक तप याची माहिती बहुतेक सर्वांना असते. त्यांच्या मानसिक परिश्र- माचीही माहिती पुष्कळ असते. समर्थ, तुकाराम महाराज यांच्या सारख्यांचें समाधान साधूजनांचेनि योगें । परी मागुतें दुःख होते वियोगें । ” अथवा ' रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग ।' किंवा ' पाउला पाउलीं करितां विचार अनंत विकार चित्ताअंगीं ॥ म्हणवुनि भयाभीत होतो जीव भाकी- तसे कींव अट्टाहासे ' असे उद्गार, आणि श्रीरामकृष्णांचे 'मी मातींत तोंड घांसून त्यावेळेस रात्रंदिवस रडत असे, ' असे सांगणे, यांत कांहीं फरक नाहीं. पंचवटींत रामकृष्णांनीं केलेली कडक तपश्चर्या जशी लोकांस ठाऊक झाली, तशीच शेंडीला दोरी बांधून केलेले तुकोबारायाचें भजनही ठाऊक आहे. रामकृष्णांना आपल्या सर्व व्यापकतेचा जगन्मातेनें दिलेला अनुभव आणि श्रीसमर्थाकरतां पंढरीची झालेली अयोध्या यांचा अर्थ एकच आहे. रामकृष्णांची अचाट तळमळ, आणि श्रीतुकाराम महाराजांचे तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ।' अथवा समर्थांचे बहूसाल भेटावया प्राण फूटे ' किंवा — वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया,' या दोन्हीही सारख्याच उद्बोधक आहेत. तेव्हां असे दिसून येतें कीं परमार्थाकरतां कसकसे कष्ट "