पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्वंद्वातला विरोध घालविण्याची खुबी. २२१ सही लागतें; आणि एवढ्याच करतां दैवी संपत्तीच्या प्रारंभी भगवंतांनी 6 , अभय या गुणास स्थान दिले. असो; अशा रीतीनें, वैदिक धर्माच्या सर्व सूक्ष्म तत्त्वांनी आपली खाजगी वाढ करावयाची, व लौकिक चरित्रांत विरोधी संस्कृतीचा जो जो परिणाम आवश्यक असेल, त्याचा त्याचा आदर करून रस्ता काढावयाचा, अशी सुंदर सांगड घालणारा मनुष्यच, पूर्वोक्त वैदिक घर्मभिमानी लोकांच्या आकांक्षा पुन्या करूं शकेल. या सर्व गोष्टींचें दिग्दर्शन, स्तोत्रकारानें ‘ संकेतरेखा नवभारतस्य ', असे वर्णन करून मोठ्या खुबीदार रीतीनें केलें आहे. त्यांच्या सर्व वागण्यांत प्रत्येक द्वंद्वाची अशी खुबीदार सांगड घातलेली आहे. बोलणें फार विपुल होतें, परंतु त्यानें त्यांचे स्वतःचें मौन कर्धी चळले नाहीं. वाटेल त्या विषयाचें प्रतिपादन करावयाचें व माहिती देण्याजोगता कोणाचाही प्रसंग वांया जाऊं द्यावयाचा नाहीं, मग त्या वेळेला स्वतः कोण- त्याही व्यवसायांत असोत, परंतु ती माहिती इतक्या सहज रीतीनें दिली जात असे की, स्वतःच्या हुषारीचें प्रदर्शन त्यांत काडीमात्रही व्हावयाचें नाहीं. ग्रंथाचें नांव तर कधींच यावयाचें नाहीं, मग त्यांनी स्वतः केलेले कष्ट व सायास यांची तर गोष्टच बोलावयास नको. आणि एका तऱ्हेनें तें बरोबर आहे. साधारणतः सर्व साधुसंतांविषयी असा एक आक्षेप घेण्यांत येतो कीं, त्यांच्या साधनकालाचा इतिहास सांपडत नाही. या गोष्टीमुळे नवीन साध- काची काय हानि होते, हा एक प्रश्नच आहे. सावनकालचा इतिहास म्हणजे त्यांनी कोणकोणच्या हेतूनें कश कशीं साधनें केलीं, तीं करीत असतां त्यांना काय अडथळे आले, माहिती व ते त्यांनी कसे दूर केले, अथवा, कसे कसे अनुभव येऊन त्यांची गोडी वाढली, व ते पुढे गेले, यांची माहिती. अशा तऱ्हेची साधुसंतांविषय मिळत नाहीं, याचें कारण केवळ यदृच्छा अथवा विनयातिरेक हैं नसून, त्याच्या मुळाश कांहीं तरी खोल हेतु आहे. साधक- भावपूर्ण होऊन गुरूपदावर आरूढ होतांच सत्पुरुषाशीं मुमुक्षु लोकांचें मोहोळ जमतें. त्यांतून सद्भाग्यानें जे त्यांच्या अंतरंगांत प्रवेश करितात, त्यांच्यापाशी प्रेमालाप करितांना असल्या कित्येक गोष्टी नाही नाही म्हणत असतांही बाहेर येतातच. अशा ज्या कित्येक गोष्टी बाहेर येतात त्या, अथव