पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक उदाहरण. २१७ त्यानंतर थोड्याशा दिवसांनी अण्णासाहेब व जिन्सीवाले यांची गांठ पडली, तेव्हां बोलण्यावरून बोलणें निघाले असतां अण्णासाहेव यांनी त्यांना सांगि- तलें कीं, 'तुझा काय पुरावा वगैरे आहे, तो सारा घेऊन ये, म्हणजे आपण लेखी वाद करूं. ' त्यावर त्यांनी सांगितले कीं, 'सामान मुंबईस आहे, आज रात्रीच मी मुंबईस जात आहे; येतांना मी जरूर सारा पुरावा घेऊन येईन.' व त्याप्रमाणें त्या रात्रीं ते गेलेही. परंतु दुर्दैवानें तेथें त्यांचा लागलींच अंत झाल्यामुळे, ते परत केव्हांच येऊं शकले नाहीत. या अतीरथी महारथ्यांचा वाद झाला असता, तर खरोखर मोठीच मौज दिसली असती, व लाभही झाला असता. परंतु तसा योग नव्हता. असो. या दोनही गोष्टी त्यांनी स्वतःच सांगितल्यावरून समजल्या. ३ सूक्तांतील काली गणसंस्था एकनायकीच असली पाहिजे. तेव्हां अशा संस्थेत प्रत्येक व्यक्ति राजशब्दोपजीवी असण्याचे कारण काय ? [ एकनायकी असण्याचे कारण उघडच आहे. बहुनायकी गणांतील घटक येवढे नेभळे, दुबळे, भित्रे, तेजोहीन, व ' आमच्या मुलाबाळांचा उत्पन्नकर्ता तूं आहेस' असें भूषणानें दुसन्यास म्हणण्याइतके स्वत्वशून्य असणे शक्यच नाहीं. राजवा- ड्यांना एकादें उदाहरण ठाऊक असेल तर कोण जाणे ? ]

४ ' न तं अंहो नदुरितं न अरातयः तितिरुः ' यांतील ' अंहो ' है पद विचारांत कां घेण्याचें सोडून दिले ? 6 ५ ' हृव्य ' व ' घृतवत्' हे वस्तुतः एकार्थकच असतां विशेषण विशेष्यांसारखे कां वापरले ? कां , हव्य याचा ‘ देवांचें अन्न ' असा रूढार्थक उपयोग केला म्हणून पुनः 'घृतवद्भिः' पद योजिलें ? यापैकी एकाचाही खुलासा नाहीं. बरें वाजसनेयी श्रुतीकडे पहावें तर तेथे तर मोठाच चमत्कार दिसतो. गणांतील स्त्रिया गणपती कडून घेण्यांत भूषण मानीत । कां तर त्यांनी- ' गणानां त्वा' वगैरे आवाहन केले आहे. परंतु हे येवढेच आवाहन केवळ भक्तिपुरःसरही असू शकेल. म्हणून त्याला जोड दिली आहे. यांत. मौज अशी आहे कीं हें देवतेचें आहे, गणपतीचें नाहीं. दोन्ही आवाहनांचे आहं अजानि' वगैरे , वसु आवाहन विनियोगही वेगळाले "