Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ 6 , साक्षात्परिचय ' इतक्यावर कोणी जास्त म्हणालाच, तर 'तुझें लिहिणे लिहून काढ, म्हणजे मी वाद करतों' असे ते म्हणत. तें केवळ गोष्ट उडवून देण्या- करितांच नव्हे, हें वरील थोड्याशा विषयांतराने लक्षांत येईल, अशा तऱ्हेचे लेखी आव्हान त्यांनी दोघांस दिल्याचें लक्षांत आहे. कशावरून कोण जाणे, परंतु गायत्रीचा प्रत्येक पाद प्रत्येक वेदांतून घेतला आहे, अशावरून कांहीं बोलणें निघून, वेदाविषयीं कांहीं वाद निघाला असतां वांईकर धर्ममार्तंडांना तुमचें म्हणणें लिहून आणा, म्हणजे मी लेखी वाद करतों, ' असें सांगि- तलें होतें. लेले शास्त्र्यांनाही स्वतःला वादाची पराकाष्ठेची हौस होती. मग हा वाद कां झाला नाहीं कोण जाणे ! त्याचप्रमाणे प्रो० जिन्सीवाले यांची आणि हंसस्वरूप स्वामींची 'वेद अपौरुषेय आहेत कां पौरुषेय आहेत, ' या विषयावर मोठी खडाजंगी झाली होती. ती पुण्यांतील लोकांस ठाऊकच आहे. 6 सिद्धांत ठरवून टाकिला. व त्याला लागलीच वाजसनेयी श्रुतीचा आधारही देऊन टाकिला याचें कारण काय तर मूळ - १ विभूतिपूर्जेतून देवाची कल्पना निघाली कां देवाच्या म्हणजे अतींद्रिय अस्तित्वाच्या कल्पनेवरून विभूतिपूजा प्रचलित झाली ? २ देवाची कल्पना म्हणजे नुसती सामर्थ्याची कल्पना कां अतींद्रियतेचें सामर्थ्य या प्रश्नांचा निकाल न करितां प्रमाणांत धरिलेला पाश्चात्य सिद्धांत. इतकेंही करून कशा मौजा झाल्या आहेत पहा. 'जनिता ब्रह्मणां असि ' याचा अर्थ 'प्रायः ज्येष्ठराज हा सर्व गणांचा साक्षात् पिता असे. ' व सर्व व्यक्ति राजशब्दोपजीवी असत. यांतील अडचणी अशाः- ( १ ) सर्व गणांचा तो साक्षात्पिता असे म्हणजे त्याच्या भोंवतालचे गणही त्याचीच संतति असे. म्हणजे केव्हां तरी त्याला तरुणपणींच ब्रह्मण- स्पतित्व मिळाले असले पाहिजे पण तसें म्हणावें तर ज्येष्ठराज म्हणजे वयानें व अनुभवानें वडील हें लागूं पडत नाहीं, बरें, तसें न म्हणावे तर 'जनिता ब्रह्मणामास ' हे सर्वांच्या स्तुतींत कसें येऊं शकेल ! २ गणराज्य संस्थेत प्रत्येक व्यक्ति नियामक असते हैं खरें पण त्यामुळे प्रत्येक व्यक्ति राजशब्दोपर्जावी होतीच हें कसें ठरतें व तसें ठरत असल्यास त्याचें वेदांत कुठें आणखी उदाहरण आहे कां ?