Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ साक्षात्परिचय ' सर्व कायम ठेवून, नव्याच्या सर्व इष्ट मिश्रणानें तयार होणारी पिढी कशी असावी, याची जर कांही कल्पना केली तर, त्यांचें उदाहरण म्हणून अण्णासाहेब यां चेकडे खुशाल बोट दाखवितां येईल. किंबहुना सर्व कलिकाला-करितां भगवंतांनी विशेष रीतीनें प्रशंसिलेल्या कर्मयोगाचें ते प्रत्यक्ष उदाहरण होतें. आमच्या- कडची युगकल्पना व त्या युगांची कालसंख्या यांचा वाद सोडून दिला, तरी एवढे दिसून येतें कीं, प्रत्येक देशांत व प्रत्येक कालांत व सामान्यतः सर्व पृथ्वीवरच उच्चनीच दशेचे फेरे कांहीं विशेष क्रमानें फिरत असतात. मग त्यांचे व्यक्त स्वरूप धार्मिक, सामाजिक राजकीय कसेंही असो या स्थित्यंतराचें कारण शोधूं जातां असे आढळून येतें कीं, त्या त्या स्थलीं जेव्हां अनुकूल काल येतो, तेव्हां गुणकर्मांनी समान असे जीव जन्मास येतात, व त्यांच्या अंतः- प्रवृत्ति आणि बाह्य परिस्थिति यांच्यांतहि एक प्रकारचा मेळ असतो. परंतु प्रतिकूल कालांत याच्या अगदी उलट घडतें. म्हणजे प्रभावशाली जीव, त्यांचें गुणकर्म, ( कर्म = कर्मसामथ्यं ) आणि परिस्थिति यांच्यातील ही व्यवस्था नाहींशी होऊन त्यांत एक प्रकारची कलना ( Heterogenity ) उत्पन्न होतें. म्हणजे परस्परविरुद्ध अशा भिन्न भिन्न सत्त्वांचा सांवळागोंधळ होऊन जातो. अशा स्थितीत ज्याला केवळ आत्मकल्याणच करावयाचे आहे, त्याला गीतेंतील आत्मार्पणरूप कर्मयोगानें अथवा पतंजलीच्या भाषेत म्हणावयाचें • म्हणजे • ईश्वरप्रणिधानानें' ते करून घेणे फारच सुलभ आहे. परंतु ज्याला आपला मार्ग असा एकलकोडेपणानें काढावयाचा नाहीं, व आपणाकरितां विश्व आणि विश्वामिळती आपण या महावैदिक सूत्रास धरून काढावयाचा आहे, ‘त्याचें काम इतर कोणत्याही कालापेक्षां फार कठीण असतें. कारण भोवतालच्या सर्व विरोधांचा परिहार करून, त्याला स्वतःचाच विरोधाभास करावयाचा असतो. त्यामुळे जितके ढंग बाहेर, तितके रंग याच्याही जवळ लागतात. तरच त्यांचा स्वतःस दुसन्यासही उपयोग होऊन कल्याण होतें. हल्लींच्या अनंत विरोधमय परिस्थितीत तर हें काम फारच कठीण आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक संस्कृतींच्या उत्कृष्ट फळांचा उपयोग करून घ्यावयाचा, हैं तर केलेच पाहिजे. कारण* Survival of the fittest चें तत्व जडजीवनासंबंधीं

  • परिस्थितीला जे उत्तम वाटतें तेंच ठिकतें.

6