1 परांतर संतोष. २०३ आहे, परंतु कठोरपणा आणि मृदुताच तर काय पण अशा सर्व विरोधांचा पुण्य- संगम त्यांच्या स्वभावांत कसा असतो, हे तिच्यावरून दिसून येईल. त्यांच्या धर्मश्रद्धेप्रमाणे त्या दिवशीं श्मश्रु करविणे श्रेयस्कर नाहीं असें तर त्यांस वाटत होतें; परंतु ' मी सांगतों, करूं नको' अशी अधिकारवाणी त्यांना तोंडांतून काढवेना. त्यांतच त्याची विशेष इच्छा दिसून आल्यामुळे त्याचा हिरमोड करावा, हेंही त्यांच्या मनास येईना. अशा चमत्कारिक स्थितीत स्वतःकडे नादिष्टपणा घेऊन, त्यांनी आपला हेतु साधण्याची खटपट केली. ही गोष्ट फारच क्षुल्लक होती, आणि तिच्यामुळे फार झालें तर ‘ काय करावें वुवा, अण्णासाहेबांनी सोडलेंच नाहीं. न्हावी निघून गेला' एवढाच टपका त्यांच्यावर आला असता हा भाग वेगळा. परंतु इतक्या दारीक गोष्टीपासून तो डफळापूर प्रकरणासारख्या मोठमोठ्या गोष्टीपर्यंतही त्यांचें वागण्याचें असेंच धोरण असे, व त्यांतच (' Thy will be done ) अशी त्यांना सर्वत्र अखंड प्रतीत होणाऱ्या ईश्वरेच्छेपुढें लीन होण्याची तयारी दिसून येई. काम म्हटले म्हणजे, तेथें मोठे आणि धाकटें, हा भेदच त्यांच्या दृष्टींत नव्हता. आणि ' येन केन प्रकारेण यस्य कस्यापि देहिनः । संतोषं जनयेत् प्राज्ञः तदेवेश्वरपूजनम् ' ॥ ही भावना त्यांच्या कृतींत पदोपदीं दिसून येई. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, 'अशी वेळ येईल की ज्यावेळी प्रत्येकाला, दोन दोन तास ध्यानधारणा करण्यापेक्षांही एकाद्या भंग्याला चिलीम भरून देण्यांतही जास्त परमार्थ आहे, असे कळून येईल. याची सत्यता अण्णासाहेब इतकी इतरत्र . क्वचितच आढळण्यांत येईल. मात्र इतकेंच की त्यांनी " देवपूजा संध्या वगैरे काय करतां ? त्याच्यापेक्षां दुसऱ्याची सेवा करण्यांतच जास्त परमार्थ आहे " असा एकदेशी उपदेश कधीं केला नाही. उलट " तेही पाहिजे, आणि हि पाहिजे, सर्व तन्हांनी आणि सर्व प्रकारांनी, कोणीकडून तरी ममत्वभाव टाकून महाराजांच्या इथें लीन होऊन गेलें पाहिजे' असेंच शिकविलें. चरित्रास जोडलेल्या अण्णासाहेब यांच्या स्तोलांत स्तोत्रकारांनी ' संकेत- रेखा नवभारतस्य ' असें त्यांचें थोडक्यांत संपूर्ण वर्णन केले आहे. वैदिक धर्माची व भारतवर्षाची उन्नति होऊन त्यानें वैभवसंपन्न व्हावे असे वाट- णाऱ्या वैदिक संस्कृतीच्या प्रत्येक पुलास त्या वैभवास योग्य असे भारतपुल कसे असावे, असे जें वाटत असेल त्या सर्वांचा जर निष्कर्ष काढला, आणि तत्त्वतः जुनें
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२७
Appearance