Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्याण. झुंडीच्या झुंडी वाड्यापाशीं जनूं लागल्या. लोकमान्यांस वर्दी पोंचून रा० भाऊसाहेब गोखले व इतर मंडळी यांच्या सल्ल्यांनी पुढील कार्यक्रम आंखून त्याप्रमाणे लागलीच छापील पत्रकें वाटण्याची त्यांनी व्यवस्था केली. इतक्या वेळांत प्रसिद्ध फोटोग्राफर रा० गोखले यांचेकडून श्री० अण्णासा- हेवांचे दोन फोटो काढविण्यांत आले. फोटोच्या वेळी श्वास थांबून २४ तास होऊन गेले होते, तरी देखील खुर्चीवर शरीर हवें तसे ठेवण्यास व त्याची हवी- तशी मांडणी करण्यास मुळींच त्रास पडला नाहीं. इतकेंच तर काय पण अगदी अखेरपर्यंत त्यांचे सर्व अवयव एकाद्या चालत्या बोलत्या माणसाप्रमाणें पूर्ण मोकळे असून मुद्रा प्रसन्न व टवटवीत होती. डोळे उघडे असल्यामुळे त्यांना स्नान घालून धोतर नेसवून दर्शनाकरितां चौकांत खुर्चीवर बसविलें, तेव्हां तर सर्वलांसच हे आहेत की गेले अशी भ्रांति उत्पन्न झाली. दर्शनास हिंदु अहिंदु अशा सर्व जातींची आणि सर्व दर्जाचीं स्त्रीपुरुष सारखीं येत होतीं. शेवटीं ठर- ल्याप्रमाणे २॥ वाजतां त्यांना पालखीत वसविण्यांत आले व भजनी दिंड्या- पुष्पें, गुलाल, हारतुरे, पैसे, बतासे वगैरेंचा वर्षाव इत्यादि प्रसंगोचित सर्व समारं- भानें शनवारवाड्यास वळसा घालून रामेश्वराहून चित्रशाळेचा कोंपरा व तेथून मोदीचा गणपती गायकवाड वाडा. वर्तकाचा हौद, शनवारचा मारुती आणि श्री ओंकारेश्वर या मार्गाने हल्ली समाधी असलेल्या जागीं मिरवीत नेऊन ठेव ण्यांत आलें. तेथें तुलसीचंदनादि पुण्यकाष्टें वगैरे सर्व व्यवस्था होतीच. प्रसं- गास उचित असे लोकमान्यांचें थोडेंसें भाषण व विरुपाक्ष मठाचे आचार्च बोधानंद भारती यांचेंहि थोडें भाषण होऊन त्या दिव्य शरीराचा सर्वांनी निरोप घेतला. अमूर्त रूपाने ते पुण्यांत अखंडच वास्तव्य करीत असतील यांत शंका नाहीं !