पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शेवटचा दिवस. १६७ तच ते हिंडूं फिरूं लागतील अशी खात्री वाटून जरा निसुर वाटू लागले. श्री० अण्णासाहेब यांचे भक्त रा. माधवराव बापट यांनाहि त्याच दिवशीं सवड होऊन त्या रात्री ते आले होते, त्यामुळे त्या दिवशीं जागण्याचे काम त्यांचेवर टाकून नेहमीं शुश्रूषा करणारे श्रीभक्त भाउराव लंबे, गोविंदवुवा, माधवराव वगैरे मंडळींनी त्या दिवशीं निजावयाचें ठरविलें व राजश्री बापट हे जवळ जागत बसले. रात्री १॥ वाजण्याचे सुमारास किती वाजले म्हणून त्यांनी एकदां चौकशी केली. त्यानंतर पुढे कांहीच चळवळ केली नाही. सकाळीं सुमारें ५॥ वाजतां मंडळी उठून पहातात तो श्वास नेहमपेक्षां जोरानें चाललेला होता व हातांच्या अंजलीने नेहमीप्रमाणे न्यास करण्याचा व नमस्काराचाहि सपाटा सुरू होता. त्यावरून घाबरून जाऊन मंडळी भोंवती येऊन बसली व कोणी महाराजांचें नांव घेऊं लागले कोणी कांहीं बोलण्याचा प्रयत्न करूं लागले. परंतु फार तर मान वळवून त्यांच्याकडे शांत व स्थिर दृष्टीनें पाहण्यापलीकडे त्याचा उपयोग झाला नाहीं. तेवढे मात्र करीत होते. त्यांचें पादोदक घ्यावें अशी इच्छा होऊन तेवढ्यांतल्या तेवढ्यांत त्यांच्या पायावर अभिषेक सुरू केला. परंतु तशा स्थितीतही त्यांनी झटकन् पाय ओढून घेतला. अर्से होतां होतां ८॥ वाजले व 'लाभ' संज्ञक उत्तम वेळ सुरू झाली. तितक्यांत श्रीभक्त सितारामपंत दांडेकर हे देवपूजा उरकून नित्याप्रमाणे नम- स्कारास आले व त्यांनी पायांवर डोके ठेविलें, तोंच श्वासाचा भाता एकदम बंद झाला. शांत मुद्रा आणि स्थिर गंभीर दृष्टि यांच्यामुळे ही गोष्ट चट्कन कोणाचे लक्षांतहि आली नाहीं; परंतु लवकरच सर्व लक्षांत आलें. हां हां म्हणतां ती बातमी चहूंकडे पसरली व सारे शहर एकदम एकाद्यास धक्का बसावा तसें. झाले; परंतु त्यांतल्या त्यांत एक लक्षांत ठेवण्याजोगती गोष्ट अशी होती की खुद्द श्री० अण्णासाहेब यांचे घरीं काय अथवा इतत्रही काय आपली कांहीं तरी प्रचंड हानि झाली याची प्रत्येक अंतःकरणास जाणीव असूनहि उदासीनता आणि दुःख यांच्याऐवजी जिकडे तिकडे एक प्रकारचा उत्साह भरल्यासारखे झाले होतें. देवाच्या उत्सवासारखा एकादा समारंभ असला म्हणजे जशी माणसांची स्थिती होते तशीच सर्वांची स्थिति होऊन शहरांतील इतर कामे बंद पडून श्री० अण्णासाहेब यांचे शेवटचें दर्शन घेण्याकरितां लोकांच्या