पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालिकलुपज्वरखंडन. १६५ देहप्रारब्ध आहे. औषध घेण्याची तरी महाराजांचीच इच्छा नाहीं कां ' असा वेदांत ऐकविण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यासरशीं नेहमींच्या तापटपणास अनु- सरून त्यांना सपाट्न झाडून टाकावें अशी वृत्ति उठल्याचें स्पष्ट दिसलें. परंतु तितक्यांत ती वृत्ति जिरवून टाकून अंतःकरणास वेदना व्हावी तशा स्वराने नुसतें ' काय म्हणतां हो तुम्ही हें ' असे म्हणून त्यांनी तोंड फिरविलें आणि टिळकांशी चिरोल खटल्यासंबंधानें बोलणे काढले. तितक्यांतच 'कां अलिकडे बँक बरी चालली आहे वाटतं' अशी कोणी बेहेऱ्यांची चेष्टाहि केली. नंतर थोडा- वेळ भाषण होऊन मंडळी उठली. माधवराव, डॉ० छत्रे वगैरेंना पलीकडच्या खोलीत गेल्यावर ' हें प्रायोपवेशन आहे. त्यांना कोणी लास देऊं नका' असे टिळकांनी स्पष्ट सांगितलें व तेथपासून प्रायोपवेशनाची कल्पना प्रचलित झाली. अशा रीतीनें दहा दिवस निघून गेले. या दहा दिवसांत क्षीणता इतकी वाढली की धरून उभे केले तरीहि नुसता भस्माचा हात फिरविण्यापलीकडे अथवा नमस्कार करण्यापलीकडे उभेदेखील राहवत नव्हते. अंथरुणावरदेखील धरून बसवावें लागे, परंतु वाड्यांत पाहुणेरावळे दोन आजारी माणसें त्यांचे संबंधी लोक अशी सर्व तऱ्हेची एकच धूम उडाली असल्यामुळे काय होत आहे हैं लक्षांत येण्यालाहि कोणाच्या अंतःकरणास फुरसत नव्हती. तरीहि दुखणे जास्त लांबले. तेव्हां तसाच प्रसाद उरकून घेऊन धुळेकरांस जाऊं द्यावें. असे कोणी म्हणाले त्यावर 'छे, छे, सर्व कांहीं ठीक होईल व प्रसाद होऊन सारेजण आनंदानें जातील' अर्से त्यांनी सांगितले. पुण्यास असा मुक्काम असतां दिवाण- खान्यांत रात्रीं अष्टपदीस बसण्याचा धुळेकरांचा नेम होता. त्याप्रमाणे शेवटचे ५।७ दिवसखेरीज करून रोज बसत असत. अशाच एका प्रसंगी आंगांत ताप आहे तेव्हां अष्टपद्यास बसणे सध्यां बंद करा म्हणूल विनंति केली असतां “वेडा आहेस, ताप होईल कां ताप जाईल? अरे बाबा 'कलिकलुषज्वरखंडने" असे अतिशय संतोषाने त्यांनी उत्तर दिलें. नेहमीप्रमाणे मारुतीराव घाटगे, पाषाणकर, बापुराव पोरे वगैरे माळी मंडळी महाराजांचें दर्शनास आली असतां “सांभाळारे बुवा श्रीतुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणें 'कलियुगीं नर । पोटाचे**चे चाकर।' असे आहे " असें म्हणून महाराजांची आठवण ठेवण्याचा अखेरचा उपदेश केला व तेथून मात्र अजीबातच भाषण बंद केलें. सुंदरलाल डॉक्टर देशास जातों म्हणून निरोप घ्यावयास आले तेव्हां ' जाशील पुढे