Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ निर्याण. बोलणे वगैरे व्यवहार तर चालूच होता. माधवराव, गोविंदबुवा वगैरेंच्या सम जुतीकरितां मियाचा काढाहि घेणे सुरूंच होते परंतु थकवा मात्र जास्त आलेला दिसत होता. गुरुवारी सकाळी एरंडेल घेतले व त्या दिवशींहि चौकांत नेहमीप्रमाणे हात दाखविणारांची गर्दी जमली. एकवेळ जुलाब होतांच इतका थकवा आला की दुसऱ्या वेळेस हाती धरून बागेत न्यावें लागलें. परंतु आल्यावर त्यांच्याच्याने उभे राहावेना तेव्हां सर्व लोकांस जावयास सांगितले. तेव्हांपासून महाराजांना भस्म लावणे वगैरे कृत्येंही दुसऱ्या माण- सांनी तोल संभाळून धरावें व घोडक्यांत उभ्या उभ्या उरकावी अशी होऊं लागली तेव्हां मात्र मंडळीस काळजी उत्पन्न झाली व त्यांनी कांहीं तरी खावें अशाविषयीं आग्रह सुरू झाला. येथून पुढे त्यांना मंडळींचा त्रास फार झाला असता हैं उघड आहे. परंतु तेही पक्केच होते. त्यांनी मुळीं माधवराव व गोविंदवुवा यांच्याशीं कामापुरतें होना करण्यापलीकडे कोणाशीहि भाषणच करावयाचें सोडून दिले. शनिवारी दुपारी त्यांना विचारिलें कीं तुम्ही कांहींच घेत नाही व मंडळी उगीच आग्रह करितात. तुम्हास कांही दिवस घ्यावयाचे नसल्यास तसें को नाहीं सांगत ? म्हणजे ते विनाकारण लास तरी देणार नाहीत. त्यावर ते कांहींच बोलले नाहीत. परंतु रात्री मात्र गोविंदवुवास म्हणाले की Ten days fasting' याला हाच उपाय आहे. असे आपण होऊन म्हणाले. इंग्रजी शब्द कधीं तोडांत यावयाचा नाही पण यावेळी काय लहर लागली कोण जाणे. सबंध वाक्यच इंग्रजीत उच्चारिलें. त्यावर 'दहा दिवसानंतर तर कांहीं घेण्यास हरकत नाहीं ना' असें गोविंदवुवांनीं विचारल्यावरून ' हो असें म्हणाले. तेव्हां गोविंदबुवा वगैरे मंडळी स्वस्थ वसली. परंतु तेवढय़ावरून कांही लोकांस स्वस्थ बसवेना. त्यांनी राजश्री बाबासाहेब मुंबईस होते त्यांना येण्याकरितां पत्र धाडले. लोकमान्यांस खबर पोहोंचून तेही राजश्री वासुकाका, दत्तोपंत बेहेरे वगैरे गणांसह समाचारास आले. ' थोडा वेळ औपचारिक प्रश्नोत्तरें झाल्यावर काहीं खात का नाही ? औषध वगैरे घ्या म्हणून त्यांनी विनंती केली. त्यावर ' का तंटा करावयाचा आहे. वाटतें ? ' असे उत्तर आलें. तितक्यावर उमजून ते गप्प बसले. परंतु दत्तोपं- तांचे समाधान तेवढ्य़ानें न होऊन 'औषध न घेण्याचा तरी आग्रह कां हैं