पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) ल्यावर सहज लक्ष्यांत येईल. चरित्रकारांनी आपले नांव प्रसिद्ध केलें नाहीं. हें त्यांचे वर्तन हल्लीच्या सार्वत्रिक रीतीरिवाजाच्या आणि आवडीच्या विरुद्ध आहे. तरी मला त्यांचा नामनिर्देश करितां येत नाहीं. चरित्र लिहिण्यांत त्यांनी नवीन पद्धतीचा उपयोग केला आहे आणि तो फार यशस्वी झाला आहे असे मला वाटतें. त्यांनी स्वतः प्रस्तावनेंत म्हटल्याप्रमाणे चटकदार होण्यापेक्षां पुस्तक जास्त उपयुक्त कसे होईल तेंच त्यांनी पाहिले आहे व तेवढ्याकरितां प्रचलित विषयांपैकीं जितके येऊं शकतील तितके प्रायशः सर्व आणून त्यावरील श्रीअ- ण्णासाहेब यांची मतें थोडक्यांत सोपपत्तिक दिलीं आहेत. त्यांचें वाचकवर्गानें खोल मनन करावे अशी माझी कळकळीची विनंति आहे. विषय मोठमोठे व महत्वाचें आणि वर्णन सूत्ररूपाचे असे असल्यामुळे ग्रंथ कित्येक स्थळीं थोडासा कठीण वाटण्याचा संभव आहे. परंतु अभ्यासाने जसजसे त्याचें मनन अधिक घडेल तसतशी अंतःस्फूर्ती जागृत होऊन विचाराच्या नवीन नवीन दिशा उजळू लागतील. पुढे यथावकाश श्रीअण्णासाहेब यांच्या 'आठवणी' प्रसिद्ध करण्याचा लेखकांचा विचार आहे. तो सिद्ध झाल्यावर प्रस्तुत चरित्र आणि त्या आठवणी एकत्र करून जो वाचील आणि त्यांचा मेळ मनामधें घालील त्याला 'ये लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन् स्थितो न दुःखन गुरुणापि विचाल्यते ॥ 2 असा लाभ प्राप्त होईल यांत संशय नाहीं. व्यावहारिक दृष्टीनें त्यापासून काय बोध घ्यावयास पाहिजे तें चरित्रकारांनींच उपसंहारामध्ये तिखटपणानें निर्भीडपणानें, आणि स्पष्टपणानें परंतु अत्यंत कळकळीने सांगितले आहे तें विचार करण्याजोगे आहे. सबंध ग्रंथ तोंडानें सांगून दुसऱ्याकडून लिहवून घेतला असल्यामुळे झालेले कांही साहजिक दोष जर सोडले तर ग्रंथाची वर्णनशैली व भाषा अशा चरि- त्रास जेशीच आहेत. राष्ट्राच्या प्रचलित स्थितीविषयीं अंतःकरण तुटून ती बाहेर आली असल्यामुळे भेदक, उद्बोधक आणि सूचक अशी झाली आहे. आणि कृत्रिमतेचा तिला गंध नसल्यामुळे 'कृताभ्यंगस्नाना कनकमणि-