Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योगाचे उद्दिष्ट. विश्वामध्येच तोही आला, स्वतःच्या उन्नतिकरितां म्हणून देखील त्यानें कांहीं करावयाचें नाहीं. ब्राह्मण म्हणजे विश्वोपयोगी शक्तीचा कारखाना. म्हणूनच ' ब्राह्मणो लोकपालकः ' असे म्हटले आहे. त्याला योग वगैरे देखील करण्याची सवड नाही, आणि गरजही पण नाहीं. हठयोगानें जो षट्चक्रभेद व्हावयाचा अथवा राजयोगानें, जी ध्यानविस्मृतिरूप समाधी लागावयाची, त्यांचे कार्य त्याच्या संस्कारित शरीरांत आणि विहिताचारांत सहजच होऊन कोणचीही 'निरोध अवस्था न होतां त्याचे सर्व शरीरच नित्यसमाधिस्थ असतें. आणि म्हणूनच ब्रह्मशरांची योग्यता केवळ ब्रह्मरूप आहे. कारण त्याच्या शरीराचा प्रत्येक परमाणु शक्तिरूपच असून विश्वांतील त्या त्या परमाणूशी शक्तीची अखंड देवघेव करीत असल्यामुळे सर्व देवतामयच आहे. हा खरा वेदमार्ग आहे. न्याच्यापासून क्रमशः झालेल्या भ्रष्टतेंमुळे पुढे ब्राह्मणांस योगादिक इतर मार्गांची गरज भासली. असो. ९९ सांगावयाची मुख्य गोष्ट अशी; अशी कल्पना करतां येते की अण्णासाहेब यांनी या वेदमूलक आणि निश्चयात्मक अशा मार्गाचा अवलंब केल्यामुळे त्यांना कोणत्याही त-हेच्या ताटस्थ्यची गरज न पडतां, इतर मार्गांनी मिळणाऱ्या उच्च "स्थितींचा अनुभव आला. योगयाग करणाच्या सर्व सांप्रदायांहून त्यांचा मार्गच मुळीं उलटा होता; म्हणजे कांहीं निराळाच होता, असे मात्र नाही. कारण योगादिक क्रियांनी तरी काय होते असे पाहिले तर असें दिसून येतें कीं, मुख्यतः तीन गोष्टी त्यांनी साधतात. शरीरांतील सर्व नाड्या खुल्या करून ( *शक्तिप्रवाह उत्तम रीतीनें वाहतील असे शरीर ठेवणें ) शरीरशुद्धि साधणे, ही त्यांतील पहिली गोष्ट होय. दुसरी गोष्ट पिंड आणि ब्रह्मांड यांचा सांधा उघडून शक्तीचा प्रवाह आंत घेणें, म्हणजे दोघांमध्यें दळणवळण स्थापित करणे, ही होय; आणि यानंतर शरीरातील विशिष्ट बिंदूंवर शक्तीचे एकी- करण करून इष्ट क्रिया करणें, अगर शरीरास सोडून ब्रह्मांडांतील इष्ट स्थळीं व्यापार करणे. या तीन गोष्टी साधणें हेंच योगाचे उद्दिष्ट आहे. हे योगानें साध्य झाल्यावर मग सर्वांचाच ग्रास करून केवल स्थितीत राहणें अगर तिचा मोह

  • नाडी म्हणजे शक्ति प्रवाह स्थानानि स्थानिभ्यो यच्छति नाडी

तेषां निबंधवम् ' ।