Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थित्यंतर. एकमेकांना सोडून कांही करता यावयाचें नाही, आणि व्हावयाचेंही पण नाहीं. एवढ्या करितां या उभयतांनीही आपल्या आचारांत परस्परांचा विचार ठेवू. नच सर्व कांही केले पाहिजे. म्हणजे एकमेकांचें एकमेकांना साह्य होऊन सर्वासच सच्चिदानंदरूपत्व येणं अशी ब्रह्मलोक स्थिति होईल. याकरितां मनुष्य शरीराची जडपणाची जी आडकाठी आहे ती जर काढून टाकली, आणि उभयतांचा संबंध जुळवून दिला, तर हें काम अधिक सुलभ होईल. वाकशक्ति ही आकाशतत्वरूप असल्यामुळे चतुर्भूतातीत आहे, आणि असें असूनही, सामान्यतः सर्व माणसांस प्राप्त आहे. यामुळे तिच्याच आधारावर अशारीतीचा मार्ग वसविला. वेद हे नित्यसिद्ध, अपौरुषेय, आणि शक्तित्रयांनी युक्त आहेत. किंबहुना सर्व सृष्टीपसारा हें वेदांचें व्यक्त रूपच होय. वेदांचा उच्चार ब्रह्मदेवानें केल्याबरोबर जर स्थूल सूक्ष्म विश्वाची उभारणी होते, तर तोच उच्चार ब्रह्मपरमाणुरूप जीवाने केला असतां कां होऊं नये ? असा विचार मनांत येतो. याचें कारण असे कीं, ब्रह्मदेवाचा वेदध्वनि हा अप्रतिह- तरीतीनें व्यक्त स्वरूपास येतो. परंतु स्वतःच्या संकल्पानेंच कां होईना, संकोच पावलेल्या ब्रह्मपरमाणूचा ध्वनि शक्तिदुर्बल असून त्यास या स्थूल सूक्ष्म शरी- राच्या गहन यंत्रांतून आपला मार्ग काढीत व्यक्त व्हावें लागतें. एवढ्या भानगडींत त्याची सत्यसंकल्पता जिरून जाते. जर ही शरीरयंत्र अगदी प्रक- तिस्थ राहतील, तर वेदोच्चारानें ब्रह्मशक्तिप्रमाणेच सृष्टिकार्य केले पाहिजे. असें पाहून तशा प्रकारची प्रकृतिस्थ शरीरें निवडून काढली, आणि त्यामुळेंच चातुर्वण्याची उत्पत्ति झाली. चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीस आमच्या इकडील सर्व ज्ञानपरंपरा सोडून केवळ सामाजिक तत्वांवर बसवूं पाहणाऱ्या पाश्चात्य लोकांचें व त्यांच्या हिंदी मानसपुत्रांचें धाडस खरोखरच विलक्षण आहे. असो. चातु- वर्ण्य विचार हा स्वतंत्र विषयच एका भागांत यावयाचा आहे, म्हणून विस्तार न करतांना एवढेंच लिहिणें भाग आहे की, अशा प्रकारें ब्राह्मणवर्ग हा प्रकृ- तिस्थ शरीरांचा म्हणून वेगळा काढून तो नित्यप्रकृतिस्थ कसा राहील, अशी आचार व विचार यांची रहाटी आणि संस्कार परंपरा त्याला निर्माण करून दिल्या. बाजतः उत्तम संस्कारयुक्त शरीर असावें आणि ब्राह्मणांनी आचार सांभाळून वेद पठण करावें, व्यक्तिविषयक विचारही कधीं मनांत आणूं नये, हैं त्याचें कर्तव्य ठरले. त्यानें जे काय करावयाचें तें सर्व विश्वाकरितां; त्या ९८