Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ स्थित्यंतर. या तिच्या चार रूपांपैकी कोणत्याही एका स्थूळ स्वरूपांत तिला हाती घेत- ल्यास, 'नर्दामुखेनैव समुद्रमाविशत् ' या न्यायानें तिच्यासह आपण विरळ या पंचतत्त्वांचा कांहीं अंशान अंडज, स्वेदज, जारज उद्भिज (झाडें ) अस होतो. आतां या पैकीं पहिल्या तिहींत अंतःकरण रूपाची स्फूर्तीरूप शक्ति कांही अंशानें प्रकट करतो. अर्थात पंचतत्त्वें निर्माण करण्याचे व्यापार किंवा अंडजादि उत्पत्तिलयाचे व्यापार अंतःकरणावांचून चालतात. तेव्हां हें व्यापार कसे चालतात, हे समजण्याकरितां अंतःकरण सोडून हा अभ्यास केला पाहिजे. .... अंतःकरण जागृति व स्वप्नावस्थेत असते. जागृतींत पूर्णपणे व स्वप्नाव- स्थेत अंशेकरून म्हणजे अहंकार व चित्त यांस सोडून असतें. आणि सुषुप्ति अवस्थेत सवाशी अंतःकरणाचा लय असतो. म्हणून उत्पत्ति, स्थिति आणि लय हे व्यापार समजण्याकरितां सुषुप्तांच्या पलीकडे गेले पाहिजे. कारण निद्रा- वस्थेंत उत्पत्ति, स्थिति आणि लय यांचे व्यापार चाललेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ, केसांचें वाढणे, रक्ताचें फिरणें, अन्नाचें रक्त होणें, व नर्क होणें, म्हणजे सारांश जागृति स्वप्न सुषुप्ति या अवस्था टाकून देऊन पलीकडे गेले पाहिजे. ती पलीकडची अवस्था तुर्या या नांवानें प्रसिद्ध आहे. या तुर्येला अंत- करणाचे काम क्रोध लोभादिक विकार नसतात. म्हणून तुर्यावस्था ही आत्म्याची शुद्ध अवस्था आहे. म्हणून तिच्या पासून उत्पत्ति, स्थिति व लय हे व्यापार निघतात. अर्थात कालाच्या संबंधानें व व्याप्तीच्या संबंधाने उत्पत्ति, स्थिति व लय या क्रियांपेक्षा मोठी असते. म्हणजे त्या क्रियांना व्यापून असते, व त्या क्रिया करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून तुर्येच्या असंख्य क्रिया आणि त्या उत्पत्ति, स्थिति आणि लय यांना सोडून देऊन पलीकडच्या राहातात. उदा- हरणार्थ, मनुष्य बोलूं लागल्यापासून मरेपर्यंत अनंत शब्द उच्चारतो. जर या शब्दांचे अती सूक्ष्म उसे बनविले आणि त्याच्या आयुष्यांतल्या शब्दांच्या ठशांचा गठ्ठा केला अशी कल्पना केली तर एकेकाचा गठ्ठा पृथ्वीपेक्षा मोठा होईल; अर्थात ज्या शक्तीपासून हे शब्द निघतात, ती शक्ति देहाला व्यापून देहाच्या बाहेर आहे, म्हणून पंचतत्त्वांना सोडून आहे. अर्थात प्राणाला सोडून आहे. ती जरा प्राणापेक्षां मोठी असते, म्हणून अमृत संज्ञा दिली आहे.... - श्री अण्णासाहेब.