पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

योगाचें मूळतत्त्व. ( अगर दिव्य स्फूर्तीनें म्हणा ) ऋषींस असे आढळून आले की, या इंद्रियगो- चर विश्वाच्या पलीकडे अतींद्रिय असे अनंत विश्व असून, त्या विश्वांतूनच या विश्वाचे उत्पत्ति स्थिति लय होतात, आणि या जड विश्वाची चालना करण्यास लागणाऱ्या सर्व शक्तींचा पुरवठा तेथून होतो. अशा रीतीनें हें दिसणारें विश्व परतंत्र असल्यामुळे यांत अनित्यत्व व सुखदुःखादि विषमत्व आहे. यास व्यापून राहणारें तें इंद्रियादिकांस अगोचर असलेले अस्तित्व याच्या मानानें नित्य एकरस अखंडसच्चिदानंदरूप आहे. लाट ज्या मार्गानें येते त्याच मार्गानें जशी ती परत जाते, तसा जावदशेला आलेला हा ब्रह्मपरमाणु पुन्हा त्याच मार्गाने मार्गे जाणे शक्य आहे. म्हणून जेणे करून हे अत्यंत सुलभरीतीनें साधेल, असा मार्ग शोधून काढणें त्यांस अवश्य वाटले; व तसा शोधावयास त्यांस लांवही जावें लागले नाहीं. कारण तें सच्चिदानंदरूप शरीराच्या कणांकणांतून व्यापून आहे, म्हणू- नच शरीर व्यापार करितें. यंत्र चालविणारी शक्ति जशी त्या यंत्राच्या प्रति- परमाणूस व्यापून असते, तसेंच हेंहि असले पाहिजे. जर यंत्राचा एकादाही परमाणू त्या शक्तीनें व्याप्त नसेल, तर तें यंत्रच चालणे शक्य नाहीं; त्याच- प्रमाणे या सबंध विश्वांत अथवा त्याची सूक्ष्म प्रतिमा जें मनुष्य शरीर, त्यांत एकादाही परमाणु या चैतन्यशक्तीनें व्याप्त नसेल, तर हें विश्व अथवा शरीर क्षणमात्रही चालणार नाहीं. मात्र इतकेंच कीं, तो शक्तीचा ओघ हातीं घेतां येत नाहीं. जर हा शक्तीचा ओघ हाती आला तर मनुष्यही स्वतः नित्य शुद्ध वुद्ध असा अखंडसच्चिदानंदरूप व त्याची सर्वव्याप्तृत्व सर्वकर्तृत्व आणि सर्वज्ञातृत्वरूप कार्ये करण्यास समर्थ असा होईल. हा शक्तीचा ओघ कसा हाती घेतां येईल, व ही गोष्ट वाटेल त्या जीवास अत्यंत सुलभ आणि अल्पकालसाध्य कशी करून देतां येईल, याचा विचार करीत असतां त्यांनी असे पाहिले कीं, शरीरास वागविणारी ही शक्ति शरी- राच्या अतीत राहून, स्थूल रूपाने शरीरांत चार प्रकारांनी काम करते; व

  • शरीराच्या अतीत राहूनः-'अनंत अनादि आणि अखंड आत्मा कांहीं

अंशानें प्राण होतो, किंवा जीव होतो इत्यादि. त्या प्राणाच्या कांहीं अंशाने खनिज म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश इत्यादि पंचतत्वात्मक होतात.