भारभ केला होता, पण. पहिली लहान लहान दोन प्रकरणे सपवून त्यानी आपले मासिक बंद केले. वर सांगितलेले ओवीबद्ध प्रथ बरेच कठिण असून शिवाय मूळ ग्रंथाचे रहस्य त्यांत पूर्णपणे आलेले नाही. फार काय, पण त्या अनुभवी साधूनी त्यांतील प्रकरणाची नावेही निराळीच ठेविली आहेत. त्यामुळे मूळ प्रथाचे प्रकरणाशः ज्ञान त्यावरून होत नाही. भाऊशाख्यांप्रमाणे शब्दशः भाषातर केल्यास तें जरा कटाळवाणे व विस्तृत होण्याचाही बराच सभव आहे. शिवाय त्यांच्याच पद्धतीचे अव- लंबन केल्यास त्यांना पुनः ते ल्याहावयाचे झाल्यास अडचण पडणार; इत्यादि गोष्ठींचा विचार करून मी हे अगदी सरळ व सोप्या भाषेत सार लिहिले आहे. त्याच्या गुणदोषाचे परीक्षण वाचकांनी करावें. यात मूळ प्रथाचे शब्दशः भाषांतर जरी नसले तरी मूळ व टीका यातील कोणताही महत्त्वाचा भाग सोडलेला नाही. विस्तार मात्र करवेल तितका कमी केला आहे. पुनरुक्तींनाही बराच सक्षेप दिला आहे. काही ठिकाणी प्रसगाला शोभतील असे नवेच दृष्टात दिले आहेत व कचित् अधिक वर्णनही केले आहे. अनेक रमणीय आख्याने व वर्णने यानी युक्त असलेला हा प्रथ वाचून वेदान्तभक्तास व इतरा- सही पुष्कळ आनद होईल व पुढचे दोन भाग वाचण्यासही ते उत्सुक होतील, अशी मला मोठी उमेद आहे. मूळ ग्रंथाच्या काविषयीं व कालाविषयी मोठा वाद आहे. कोणी म्हणतात की, जवळ जवळ वास्मीकिरामायणा इतकाच हा ग्रंथ जुना असून दोघाचे कर्ते वाल्मीकिमुनीच होत. कित्येक आधुनिक म्हणतात की, रामायणापेक्षां या ग्रंथाची भाषा कठीण आहे, व विषयही अद्वैत वेदान्त आहे. यास्तव श्रीशंकराचार्याच्या मागन त्याच्या परपरेतील कोणीतरी विद्वान् यतीने हा ग्रंथ रचिलेला असावा शिवाय श्रीमत् आचार्याच्या भाष्यांत यांतील एकाचाही श्लोकाचे अवतरण घेतलेलें आढळत नाही. तेव्हा हा प्रथ त्यांच्यावेळी उपलब्ध नव्हता, असेंच म्हणावे लागते. यावर माझ्यासारख्या सारमाही मनुष्याचे एवढेच उत्तर आहे की, यातील कोणताही पक्ष जरी खरा असला तरी त्यांत आमची किंवा वेदान्त-शास्त्राची काही हानि नाही. आम्हाला प्रथाच्या तात्पर्या- कडे पहावयाचे आहे. त्याचा कर्ता व काल या गौण गोष्टींकडे फारसें
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/४
Appearance