पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

TSubaswam) DRO DICSnorts फर SODEDic snor: प्रस्तावना. श्रीमगृहद्योगवासिष्ठसार भाग पहिला. या नावाचे हे पुस्तक माझ्या प्रिय महाराष्ट्र बांधवांस सादर, सप्रेम व सविनय समर्पण करण्याचा सुयोग माला याबद्दल नियंत्याचे अनत उपकार मानणे, हे माझें प्रथम कर्तव्य आहे. योगवासिष्ठ (अथवा वासिष्ठ महारामायण ) हा अद्वैतवदान्ताचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्याचा बत्तीस हजार प्रथ असून सहा प्रकरणे आहेत. त्यातील पहिल्या तीन (म्हणजे वैराग्य, मुमुक्षुव्यवहार व उत्पत्ति या) प्रकरणाचा संग्रह या प्रथात केला आहे. या तिन्ही प्रकरणाचे मिळून सुमारे साडे नऊ सहस्र श्लोक असून त्याचे व त्यावरील आनदबोधेद्र-सरस्वती-विरचित वासिष्ठमहारामायणतात्पर्यप्रकाश नावाच्या टीकेचे सार या पुस्तकात आले आहे. ईश्वराची इच्छा असल्यास पुढच्या, स्थिति व उपशम या दोन प्रकरणाचे (ह्मणजे सुमारे आठ हजार श्लोकाचे) सार दुसऱ्या भागात व निर्वाण नामक शेवटच्या प्रकरणाचे (म. सुमारे साडे चवदा हजार भोकाचे) सार तिसऱ्या भागात आणावे, असा विचार आहे. वसिष्ठानी मास केलेला उपदेश ब्रह्मदेवाच्या सागण्यावरून श्रीवाल्मीकि-मुनींनी थरूपाने रचिला, अशी याची मूळ आख्यायिका आहे, व त्याचे सविस्तर वर्णन पहिल्याच प्रकरणात आले आहे. यास्तव येथे त्याचा अधिक विस्तार करण्याचे कारण दिसत नाही. निर्णयसागर छापखान्याच्या मालकानी ‘लघुयोगवासिष्ठ' ह्मणन एक सटीक संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. ते या बृहद्योगवासिष्ठाचे अथवा वासिष्ठ महारामायणाचेच सक्षिप्त रूप आहे रगनाथी योगवासिष्ठ व योग- वासिष्ठसार या नावाचे मराठी ओवीबद्ध ग्रंथ आहेत. तेही याच्या आधारा- नेच लिहिलेले ग्रंथ होत. सुमारे दहा वर्षापूर्वी वे. शा. स. भाऊशास्त्री लेले यांनी आर्यधर्मदर्पण या नावाच्या मासिकात याचे शब्दशः भाषांतर देण्यास