१. वैराग्यप्रकरण-सर्ग १३. परदेशास वास्तव्य भूमि व जन्मभूमीस परदेश करिते. या लक्ष्मीच्या आशेनेच मनुष्य सत्य सोडतो, विश्वासघात करितो; कपटी होतो, अन्याय व बलात्कार करितो; निर्दय होतो, व इतस्ततः धावत सुटतो. दिव्याच्या ज्योतीवरून बोट फिरविले असता ते जसे काळे होते त्याप्रमाणे या लक्ष्मीचा स्पर्श झाला असता मनुष्याचे क्षमा, औदार्य, प्रेम इत्यादि 1 ण जातात व त्याच्या स्वभावावर दुगुणाचा मळ बसतो. यास्तव अशा या रोषप्रचुर लक्ष्मीस आश्रय देणे ह्मणजे आपल्याच हातानी आपला घात करणे आहे. पण काय सागावे, महाराज, हे तत्त्व सवीच्याच ध्यानात येत नाही, व त्यामुळे लक्ष्मीस नसतेच महत्त्व आले आहे. मनुष्यमात्रास अन्न, वस्त्र व निवाऱ्याचे स्थान ही अवश्य पाहिजेत. त्यावाचून त्याचे चालणारच नाही. ह्मणून तेवढ्या पुरते लागणारे द्रव्य जर कोणी मिळवू व.साठवू लागला तर त्यात त्याच्याकडे फारसा दोष येणार नाही. फारसा झणण्याचे कारण असे की ज्या कचित् एकाद्या मनुष्याचा-ईश्वर कोणाचीही उपेक्षा करीत नाही; तो विश्वभर आहे. प्राणिमात्राचे रक्षण करीत असताना तो मलाच उपाशीं मारील हे सभवत नाही. पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादिकास जसे तो त्याचे अन्न तयार करून देतो, तसेच माझेही अन्न व समाजस्थितीस अवश्य असलेले वस्त्रादि मला देईल, असा दृढ विश्वास असतो, तो जर एकाद्या पामग- प्रमाणं द्रव्याकरिता हाय हाय करू लागला तर तो केवल दोषीच नव्हे तर महादोषी आहे, असे ह्मणावे लागेल. पण अगोदर इतका निग्रही मनुष्यच विरला व जो कोणी कोट्यावधि लोकात असा एकादा असेल तो या दोषास पात्रच होणार नाही. परतु वर सागितलेल्या तीन पदार्था- वाचून इतर मौजेच्या साधनाकरिता जेव्हा मनुष्य धडपड करू लागतो तेव्हा त्याची दया आल्यावाचून रहात नाही व अशा वेळी त्याच्या हातून घडणारे द्रोष मर्यादेच्या बाहेर गेलेले असतात. ह्मणून खरा महादोषी तोच आहे. त्याच्या अपेक्षेने वरील पुरुष अल्प दोषीच ठरतात. प्रत्येक मनुष्य ह्मणतो की पोटाकरिता ही सगळी खटपट चालली आहे. पण हे ह्मणणे सत्यास धरून नाही. कारण केवल जाड्या भरड्या अन्नाक- करिता व वस्त्राकरिताच कोणी इतकी खटपट करीत नाही. तर त्याच्या दुसऱ्या ज्या अनिवार्य आशा असतात त्या पुऱ्या करून घेण्याकरिता
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२९
Appearance