२४ बृहद्योगवासिष्ठसार. जाणत असूनही मूढ झालो आहों. या प्रपंचांतील विषयसुखलेश अति अमगल आहेत. कारण एकतर ते क्षणिक आहेत व दुसरे, दुःखास कारण होतात. पण असे असतांनाही आम्ही व्यर्थ त्याच्या आशेत गुतून गेलो आहो. फार दिवसांनी मला हे समजले. आता मला राज्य काय करावर चे आहे ? भोगांपासून मला काय मिळणार ? वस्तुतः मीच कोण आहे ? व हे जग कां व कोठून आले ? सर्वच चमत्कार आहे. हे सर्व मायामात्र आहे. मायेमुळे आह्मास ते भासते. त्यात सत्याचा लेशही नाही. अशा प्रकारचा विचार मनात आल्यापासून मला कांही एक नकोसे झाले आहे. हे प्रत्यक्ष दिसणारे जग व त्यातील पदार्थ पहाता पहातां नाहीसे होतात व कित्येक नवे नवेच उत्पन्न होतात. उत्पन्न झालेल्या त्या पदार्थातील काही थोडे दिवस वाचतात, काही फार दिवस रहातात पण शेवटी ते नाहीसे होतातच. पण ही सर्व घडामोड कशी व का होते आणि हिचा कर्ता कोण ? या तीन प्रश्नांचे उत्तर मला कोणी दिल्यास मी ते लक्ष देऊन ऐकेन. या वाचून मला दुसरे काही नको. वाद्यामध्ये जसा वारा जात-येत असतो त्याप्रमाणे नाकाच्या छिद्रातून आंत जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या या जड प्राणांचीही मला गरज नाही. मग धनादि इतर वस्तूची काय कथा ? जरा, मरण, आपत्ति, जन्म, अनाँचे कारण सपत्ति व हर्ष-विषाद यापासून मी कसा सुटेन ? चिते- सारिखें चित्तास जाळणारे दुसरे काही नाही. तथापि ज्याच्या चित्तात विवेक जागत असतो त्यास या वरील पिशाचाची बाधा होत नाही, हे मी समजतों, पण तो विवेक दृढ न झाल्यामुळे माझे चित्त शात होत नाही १२. सर्ग १३-सर्व मूढांस प्रिय असणाऱ्या व भोग देऊन अनर्थात पाडणाऱ्या लक्ष्मीची येथे निंदा केली आहे. मुनिवर्य या जगात लक्ष्मीचे दास जितकें दुःख भोगीत असतात तितके दुःख दुसऱ्या कोणासही होत नसेल, असें मी समजतो. पण ती बाई मनुष्यमात्रास मोहित करते. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ती अविवेक्यास कल्याणापासून दूर ओढून नेते. अनेक चिता ह्याच हिच्या कन्या आहेत, व दुष्ट आचरणाने त्या प्रत्यही वाढत असतात ही दुष्ट लक्ष्मी मनुष्यास रात्री सुरवाने निजू देत नाही, दिवसां बसू देत नाही व एकाच स्थानी फार दिवस राहू देत नाही. मित्रास अमित्र व शत्रूस मित्र बनविते,
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/२८
Appearance