पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. सर्ग २-या सगांत या शास्त्राचा अधिकारी, उपाय, ब्रह्मदेवाच्या आज्ञेने या प्रथाचा आरंभ व भरद्वाजाचा प्रश्न यांचे वर्णन केले आहे. वाल्मीकि ह्मणतात-बा राजा, " मी बद्ध आहे. मला या बंधानांतून मुक्त झाले पाहिजे" अशी ज्यास उत्कट इच्छा झाली असेल तो या पुढील उपदेशाचा अधिकारी होय. अति अज्ञही या उपदेशाचे पात्र नाहीं व अति ज्ञानीही याचा खरा भोक्ता नव्हे. ज्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो तोच अति ज्ञानी होय. पूर्व रामायणावरून प्रवृत्ति धर्माचे उपाय समजून घेऊन त्याचे यथाविधि अनुष्ठान करावे व चित्तशद्धि हे त्याचे फल प्राप्त झाले असता या मोक्षोपायाचा विचार करावा. याप्रमाणे जो करतो तो या कष्टकर ससारात पुनः जन्म घेत नाही. मनुष्याच्या चित्तातील राग- लोभादि दोष समूल नाहीसे व्हावे या हेतूने मी पूर्वरामायण केले व तो चोवीस सहस्र प्रथ आपल्या भरद्वाजनामक शिष्यास शिकविला वाल्मीकि- रामायण या नावाने या लोकी प्रसिद्ध असलेल्या त्या प्रथानतर उत्तर रामायण ह्मणून आणखी एक बत्तीस सहस्र श्लोकाचा ग्रंथ करावा, असे माझ्या मनात होतेच. कारण पूर्व रामायणात मी श्रीरामाच्या प्रवृत्ति मार्गाचे वर्णन केले आहे व या उत्तररामायणात निवृत्तिमार्गाचे उपपादन करावे असा माझा उद्देश होता. इतक्यात तो भरद्वाज मेरूवरील ब्रह्मदेवाच्या सभेत गेला व त्याने ते पूर्व रामायण तेथे ह्मणून दाखविले. ते ऐकून परमेष्टीस मोठा आनद झाला, व त्याने भरद्वाजास " वर माग" ह्मणून झटले. ते- व्हा तो माझा परोपकारी शिष्य ह्मणाला, " हे भगवन् , सर्व प्राणी दुःखातून कसे मुक्त होतील ते सागा!" हे ऐकून तो पितामह ह्मणाला- प्रिय भरद्वाजा, याविषयी तू आपल्या गुरूची प्रार्थना कर. त्याने जे हे रामायण आरभिले आहे, त्याचे अध्ययन केले असता मनुष्य मुक्त होतील. असे बोलून तो देव लागलाच स्वतः माझ्या आश्रमास आला. मी त्याची यथाविधि पूजा केल्यावर तो ह्मणाला, "मुने, आरभिलेले हे रामायण मध्येच सोडू नकोस. कारण एवढा मोठा प्रथ लिहिता लिहिता कटाळा येण्याचा सभव आहे. ह्मणून मी हे मुद्दाम सागण्याकरिता येथे आलो आहे. हा १ यावरून स्त्रीशूद्रादि मनुष्यमात्रास या वेदान्त प्रथाच्या श्रवणाचा अधिकार आहे, असे ठरते. कारण “ मुक्त होण्याची उत्कट इन्छा " हेच येथील अधिकाऱ्याचे लक्षण आहे.