१. वैराग्यप्रकरणं-सर्ग १.
वाल्मीकि म्हणाले - शापाच्या निमित्ताने स्वतः हरीच राम झाला, व बळेच आपल्या मध्ये अज्ञान आणून तो प्रभु किचिज्ज्ञ म्हणजे सामान्य जीव झाला. एकदा निष्काम सनत्कुमार ब्रह्मदेवाच्या लोकी रहात असता तेथे तो श्रीहरी वैकुठाहून आला. ब्रह्मदेवाने त्याची पूजा केली व त्यानतर सनत्कुमारावाचून सत्य लोकातील दुसऱ्या सर्वानीही त्याचा योग्य सत्कार केला. ते पाहून तो भगवान् सनत्कुमारास म्हणाला, सनत्कुमारा, निष्काम असल्यामुळे तू इतका गर्वित झाला आहेस काय ? तू कामविह्वल शरभग हो " भगवानाचा हा शाप ऐकताच त्या तेजेस्वी ब्राह्मणासही राग आला व तो उठला आणि ह्मणाला “तुझे जे सर्वज्ञत्व आहे, त्याचाही लोप होऊन तू अज्ञानी होशील. " त्याचप्रमाणे एकदा शुक्राचार्य समाविस्थ असताना देवाच्या भीतीने शरण आलेल्या असुराचे, आश्रमात असलेल्या याच्या पत्नीने आपल्या पातिव्रत्याच्या सामर्थ्याने देवाच्या अस्त्रास निष्फल करून, रक्षण केले. ते पाहून देवाचा पक्ष घेणाऱ्या विष्णूने सुदर्शनाने तिचा शिर छेद केला नतर समावि सोडून उठलेल्या भृगूने क्रोधानें झटले " हे विष्णो, तुझ्याही भार्येची व तुझी ताटातूट होईल राचा वेष घेऊन त्या भगवानाने देवकार्याकरिता वृदेचे पातिव्रत्य नष्ट केले. तेव्हा ती जलधरपत्नी त्यास ह्मणाली “ विष्णो ज्याअर्थी तू कपट करून व मला फसवून माझ्या पतीस मारले आहेस त्याअर्थी तूही स्त्रीविरहाचे दुःख भोगशील ! " पयोष्णीचे तीरी असलेल्या देवदत्ताच्या भितया स्त्रीने श्रीविष्णूच्या नारसिंह अवताराचे भयकर स्वरूप पाहताच प्राण सोडले. त्यामुळे दुःखाने विह्वल झालेल्या त्याने " तुलाही मजप्रमाणेच स्त्रीविरह होईल" असा भगवानास शाप दिला. या चार शापामुळे त्या सर्वज्ञ ईश्वरास दशरथाच्या उदरी राम या नावाने अवतीर्ण व्हावे लागले. असो, अशा त्या रामास वैराग्य उत्पन्न झाले असता बसिष्ठानी कसा उपदेश केला, ते मी तुला सविस्तर सागतो, ह्मणजे तुला
मोक्षसाधनाचे ज्ञान होईल १.
१ तेजस्वी व निस्पृह ब्राह्मण प्रत्यक्ष भगवानासही मोजित नाहीत व अन्यायाचा
प्रतिकार तेजस्वी झाल्यावाचून करिता येत नाही, हे या आख्यायिकेचें रहस्य आहे.