माझा हिस्सा द्या' असें ह्मणत चालला. विहारांत गेल्यावर बुद्ध भगवंतांनीं सारिपुत्राला बोलावून- पैतृक धन देण्याच्या उद्देशानें- राहुलकुमारास संन्यास देण्यास सांगितलें. राहुलाच्या वयास २० वर्षे झाली नव्हतीं ह्मणून त्यास श्रामणेर करण्यांत आलें. तेव्हांपासून श्रामणेर करण्याची पद्धत सुरू झाली.
श्रामणेरानें स्वतंत्र राहतां कामा नये. भिक्षूंच्या आश्रयानेंच राहिलें पाहिजे. त्याला दीक्षा देते वेळीं त्याचें मुंडन करितात; नंतर काषाय वस्त्रे घेऊन तेथे जमलेल्या भिक्षूंला नमस्कार करून तो पुढील वाक्य त्रिवार उच्चारितो.
"सब्बदुक्खनिस्सरणनिब्बाणसच्छिकरणत्थं इदं कासावं गहेत्वा पब्बाजेथ मं भन्ते अनुकंपं उपादाय."
(सर्व दुःखापासून मुक्त अशा निर्वाणाचा साक्षात्कार करण्याकरितां ही काषायवस्त्रे घेऊन अनुकंपा करून मला संन्यास द्या.)
नंतर त्यांतील एक भिक्षु त्याला 'बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि,' हीं वाक्यें त्रिवार उच्चारावयास लावतो, व त्याने पाळावयाचे दहा नियम त्यास शिकवितो. (१) प्राणघातापासून विरत होणें. (२) चोरीपासून विरत होणें. (३) ब्रह्मचर्य धारण करणें. (४) खोटें न बोलणे. (५) सुरादि मादक पदार्थांचे सेवन न करणें. (६) माध्याह्नकालापूर्वी जेवणे. (७) नृत्यगीतादि कामविकार उत्पन्न होणाऱ्या गोष्टी न पाहणे. (८) मालागंधादि (चैनीच्या) पदार्थांचें धारण न करणें. (९) उंच आणि मोठ्या शय्येवर न निजणे. व (१०) सोनें आणि रुपें यांचा स्वीकार न करणें. हे दहा नियम श्रामणेराने पाळले पाहिजेत.
भिक्षुसंघानें महिन्यांतून पूर्णिमा आणि कृष्णचतुर्दशी या दोन दिवशी एकत्र जमून उपोसथकर्म केलें पाहिजे. त्या दिवशीं
पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/७६
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६६ )