Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६५ )

ण्याला ठार मारील, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल ........ ह्मणून यावज्जीव ही गोष्ट तूं करतां कामा नये.
 उ०:- होय महाराज.
 भि०:- संघांत प्रवेश केलेल्या भिक्षूनें आपणास ध्यानसमाधि प्राप्त झाल्याच्या वल्गना करितां कामा नये. एकांतांतच राहण्यांत मला आनंद वाटतो, अशी प्रौढी देखील त्यानें सांगतां कामा नये. जो भिक्षु पापी इच्छेनें तृष्णावश होऊन आपणास ध्यानसमाधि प्राप्त झाल्याच्या खोट्या गप्पा (लोकांस) सांगेल, तो अश्रमण होईल, अशाक्यपुत्रीय होईल..... ह्मणून यावज्जीव ही गोष्ट तूं करितां कामा नये.
 उ०:- होय महाराज.
 या उपसंपदाविधीच्या संक्षिप्त वर्णनावरून भिक्षूस मुख्यतः कोणकोणते नियम पाळावे लागतात याची आपणास थोडीबहुत कल्पना करितां येईलच. आतां श्रामणेर ह्मणजे काय? हे थोडक्यांत सांगतों.
 बुद्धभगवान् कांहीं काल राजगृहांत राहून तेथून धर्मोपदेश करीत करीत कपिलवस्तु नगरीस गेले. तेथे ते निग्रोधाराम नांवाच्या विहारांत राहत होते. एके दिवशीं भिक्षेसाठीं कपिलवस्तु नगरीत त्यांनीं प्रवेश केला, व ते फिरत फिरत शुद्धोदन राजाच्या घरीं गेले. तेथें त्यांना बसण्यासाठी मांडलेल्या आसनावर ते बसले असतां राहुलाच्या आईनें (बोधिसत्वाच्या पत्नीनें) त्यांस पाहिले, व ती राहूलकुमारास ह्मणाली "बाळ हा पहा तुझा बाप त्याच्या जवळ जाऊन तुझा हिस्सा (दायभाग) माग!" हे आईचे शब्द ऐकून राहुल बुद्धासमोर जाऊन उभा राहिला. बुद्ध भगवान् कांहीं वेळाने आसनावरून उठून चालते झाले. राहुलहि त्यांच्या मागोमाग 'मला