Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५८ )

 सारिपुत्त:- तुझ्या गुरुचा धर्म कोणता? कोणतें मत तो प्रतिपादन करितो?
 अस्सजि:- मी नुकताच बुद्धाचा शिष्य झालों आहे; विस्तृत धर्मोपदेश करण्यास मी समर्थ नाहीं. तथापि संक्षेपानें सारांश काय आहे हें मी सांगूं शकेन.
 सारिपुत्त:- कांहीं हरकत नाहीं. थोडें किंवा फार जें कांहीं तुला येत असेल तेवढें सांग. मला सारांश पाहिजे आहे. वाग्जाल घेऊन काय करायाचें?
 अस्सजि:-

येधम्मा हेतुप्पभवा हेतुं तेसं तथागतो आह ।
तेसं च यो निरोधो एवंवादी महासमणो[]

 कारणापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ पंचस्कन्धादिक दुःखद पदार्थ त्यांचें कारण तथागतानें सांगितलें आहे, आणि त्यांचा निरोध कसा होतो हेंहि सांगितलें आहे, हेंच महाश्रमणाचे मत होय.
 हे समजल्यावर सारिपुत्ताच्या अंतःकरणांत एकदम प्रकाश पडला. हें वर्तमान त्यानें मोग्गल्लानाला कळविलें. तेव्हां ते दोघेहि बुद्धापाशीं गेले, आणि त्यांनी भिक्षुसंघांत प्रवेश केला. त्यांजबरोबर संजय परिव्राजकाचे आणखीहि २५० शिष्य बुद्धाचे शिष्य झाले. सारिपुत्त व मोग्गलान हे दोघे पुढें अग्रश्रावक (बुद्धाचे प्रमुख शिष्य) झाले.

 बुद्ध भगवंताच्या आगमनानें राजगृह नगरीत जिकडे तिकडे गडबड उडून गेली होती. आज हा बुद्धांचा शिष्य झाला,


  1. ही गाथा फार प्रसिद्ध असून प्राचीन शिलालेखांत पुष्कळ ठिकाणीं सांपडते.