Jump to content

पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ५० )

प्राण्यांची काय स्थिति होती हे कोणाच्यानेंहि सांगतां येणार नाहीं. हा सगळा संसार अनादि आहे, अर्थात अविद्याहि अनादि आहे. बुद्ध भगवान् ह्मणतात:-
 "अनमतग्गोयं भिक्खवे संसारो पुब्बा कोटि न पञ्ञायति, अविज्जानीवरणानं सत्तानं तण्हासञ्ञोजनानं संधावतं संसरतं ॥"
 (भिक्षूहो, हा संसार अनादि आहे. अविद्येनें आच्छादिलेल्या आणि तृष्णेनें बद्ध झालेल्या संसारचक्रांत सांपडलेल्या प्राण्यांची पूर्व स्थिति काय होती, हें कांहीं समजत नाहीं.)

(संयुत्तनिकाय)

 आर्य अष्टांगिक मार्ग जसा साधनमार्गात दोन्ही अंत टाळून मध्यमवर्ती आहे, तसा हा प्रतीत्यसमुत्पाद तत्वज्ञानमतांत मध्यमवर्ती आहे. बुद्धाच्या वेळीं अस्तिवादी ह्मणजे आत्मा शाश्वत वस्तु आहे असें ह्मणणारे कांहीं तत्ववेत्ते होते. दुसरे नास्तिवादी ह्मणजे आत्मा अशी कांहींच वस्तु नाहीं असें ह्मणणारे होते. या दोहोंच्यामधील मत प्रतीत्यसमुत्पाद हे आहे. कारण त्याप्रमाणें आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत पदार्थ नसून कार्यकारण नियमाने बदलणारा आहे. इदं सति इदं होति इदं असति इदं न होति. कारण असेल तर कार्य होतें, कारण नसेल तर कार्य होत नाहीं.
 बुद्धभगवान् कात्यायनाला ह्मणतात:-
 "सब्बं अत्थीति खो कच्चान अयमेको अंतो । सब्बं नत्थीति अयं दुतियो अंतो । एते ते उभो अंते अनुपगम्म मज्झेन तथागतो धम्मं देसेति अविज्जापच्छया संखारा ॥ पे० ॥"
 हे कात्यायना सर्व आहे (आत्मा नित्य आहे) हा एक