करावा, ध्येयाचा साक्षात्कार करून घ्यावा, व अभ्यसनीयाचा अभ्यास करावा.
अविद्येपासून संस्कार, संस्कारांपासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म), जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दुःख, दौर्मनस्य, उपायास उत्पन्न होतात. या कारणपरंपरेला प्रतीत्यसमुत्पाद असें ह्मणतात. जरामरणाचें कारण जन्म, जन्माचें कारण भव ह्मणजे कर्म, कर्माचें कारण उपादान ह्मणजे लोभ, लोभाचें कारण तृष्णा, तृष्णेचें कारण वेदना ह्मणजे सुख, दुःख, उपेक्षा या तीन अवस्था, वेदनांचें कारण स्पर्श ह्मणजे इंद्रिविषयसंयोग, स्पर्शाचें कारण षडायतन ह्मणजे मन आणि पांच ज्ञानेंद्रियें, षडायतनाचे कारण नामरूप, नामरूपाचें कारण विज्ञान ह्मणजे जाणीव, विज्ञानाचें कारण संस्कार ह्मणजे प्रवृत्ती, संस्कारांचें कारण अविद्या ह्मणजे अयथार्थ ज्ञान. अयथार्थ ज्ञानाचे बौद्धमताप्रमाणें संक्षेपतः तीन प्रकार आहेत. (१) जग अनित्य- ह्मणजे रूपांतर पावणारें- असतां तें नित्य आहे, असें मानणें. (२) आत्मा ह्मणून अविनाशी, अविकारी असा पदार्थ नसतां तो आहे असें मानणें. (३) संसार दुःखमय असतांना त्यांतच सर्व सुख आहे असें मानणें. या प्रकारचें अयथार्थ ज्ञान सर्व संसारदुःखाचें आद्यमूळ होय. चार आर्यसत्यांच्या ज्ञानानें या अविद्येचा नाश होतो; आणि अवि- द्येचा नाश झाला ह्मणजे तिच्यावर अवलंबून असलेल्या संस्कारांदिकांचा आपोआप नाश होतो. अविद्या उत्पन्न होण्यापूर्वी
बु० ५
पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/५९
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४९ )