पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. wwwwwwwwwwwwwww [१८६ ] नारोजी वल्लद बच्याजी व रघोजी वल्लद नथोजी व भिकाजी वल्द रघोजी राजपुर गवडे वस्ती मौजे निंबलक परगणे पारनेर तुझी हुजूर कसबें पुण्याचे इ. स. १७५३-५४. आर्वा खमसैन मुक्कामी विनंती केली की, आपले रेवजी राजपुरे गवंडे यानें मौजें वड - मया व अलफ गांव येथून अहमदनगरांत नहर बांधोन पाणी नेलें ह्मणोन अहमदशा साबान ११. पातशाहा तक्तनिशीन अहमदनगर यांनी मेहेरबान होऊन कारागिरीस पसंत करून मौजें निंबलक परगणे मजकूर हा गांव वंशपरंपरेनें कुलबाब कुलकानु आपल्या वडिलांस इनाम दिला. काही दिवस चालला. अलीकडे धामधुमीमुळे गांव टाकून आपण परागदा होऊन गेलो. त्यामुळे मौजे मजकूरचा भोगवटा राहिला. सांप्रत बहुत दिवस साहेबांचे पदरीं आपले वडील व आपण चाकरी करीत आहो. पूर्वील इनामपत्रे मनास आणून मोज मजकूर इनाम पूर्ववत वंशपरंपरेनें देणार साहेब धनी आहेत ह्मणोन. त्याजवरून पूर्वील पातशाहीचे इनामपत्र आहे ते मनास आणून तुमच्या वडिलानी व तुह्मी बहुत दिवस सेवा एक निष्ठेने केली. पुरातन कारागीर श्रम साहास बहुत केले आहेत. हे जाणोन तुह्मांवर कृपाळू होऊन मौजें मजकूर मोंगलाई व स्वराज्यपैकी बाबती दरोबस्त खेरीज हक्कदार व इनामदार इनाम करून दिला असे. तरी मौजे मजकूर आपले दुमाला करून घेऊन तुझी व तुमच पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने मोंगलाई व बाबती इनाम अनभवून सुखरूप राहणे ह्मणोन मशार निल्हेचे नांवें इनाम पत्र १. मोकदम मौजें मजकूर यांस - देशमुख देशपांडे यांस देशाधिकारी व लेखक वर्तमान भावी यांस. नारो बाबाजी परगणे पारनेर यांस पत्र की इनाम पत्राप्रमाणे चालवणे ह्मणोन. १ ( 186 ) Letter to Naroji wallad Bachaji, Raghoji wallad Nathoji and Bhicas wallad Raghoji Rajpure masons,---residents of Nimblak in ParA. D. 1753-54. 03-54. gana Parner Coming to the Huzur at Poona, you represent that your ancestor, Rewaji Rajpure Mason constructed a water aqueduct from Wadgaon to Ahmednagar, that Emperor Ahmedsha was pleased with the execution of the work, and granted in Inam the village of Nimblak in the above Pargana hereditarily to his ancestor, that the Inam was enjoyed by him for some time, and that he lost its possession in consequence of his having, during * troublesome period, left the village. You pray that as you and your ancestor have for a long time been in the service of Government, the old title deeds may be inspected and the Inam may be continued hereditarily as of old. The request is complied with.