पान:बाळमित्र भाग २.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०६ बाळमित्र. गोविं०- नाही, आणखी एक दे. तात्या -बरें तर, घे. गोविं०- (गंजिफा उलटून पाहतो.) माझे ठिपके जा- स्ती झाले, आतां मीच हरलो.. तात्या- ( दाजीस ह्मणतो.) तुला पाहिजेत ? दाजी- होय, मलाही एक पाहिजे. तात्या- घे तर. दाजी- माझे एकति सांवर ठिपके झाले, मीही हरलों. तात्या- (विठूस ह्मणतो.) आतां तूंही हरशील. कां९ गंजिफा देऊ ९ विठू- ते दोघेजण हरले त्यापक्षी मला नकोत. तात्या- तर मलाही नकोत. मोज, मोज, तुझ्या गंजि- फांवर किती ठिपके आहेत ? विठ्ठ-पंचवीस. तात्या- तर माझे ! तीस ! म्यांच जिंकिलें. मी मनांत आणले तर हेच उलटे करून दाखवीन. जिंकणे अथवा हरणे ही दोन्ही माझ्या हातांत आहेत. आतां माधवाची बहीण आली मणजे पाहशील चमत्कार. गोविं०- तर आमच्याही मनांत येईल तेव्हां आझी ही जिंकू. तूं ते कशावरून बोलतोस ? नात्या- हे शिकावयाकरितां त्वां आपले सर्व पैसे मजकडे हरविले ह्मणून मी ह्यांतला भेद तुला क. कवितों. माझी चाल आहे, मी पैसे जिंकल्यानं-