पान:बालहक्क (Balhakk).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न १४ बाल कामगार आढळल्यास कोणती पावले उचलाल ?
उत्तर :

■ बाल कामगार आढळल्यास ते बालक करीत असलेल्या कामात कोणताही अडथळा न आणता सदर बालकाकडून बालकामगार म्हूणन काम करण्या मागची कारणे तपासावी.
■ पालक, मालक, बालकाला मिळत असलेला मोबदला याची माहिती घ्यावी.
■ अन्न, वस्त्र, निवारा या बाबतची माहिती घ्यावी. शिक्षणाची शाळेबाबतची माहिती घ्यावी.
■ त्यानंतर सदर बाल कामगाराची सर्व माहिती कामगार आयुक्तांना कळवावी.
■ पालक, मालक यांना चौकशीसाठी बाल-संरक्षण समिती समोर हजर रहाण्यास सांगावे.
■ त्यांचे समुपदेशन करावे त्यांना कायद्याची माहिती द्यावी.

■ बालकामगारांचा प्राथमिक गरजा आणि मुलभूत शिक्षणाची गरज पूर्ण करण्यास काही अडचण आहे का हे समजून घ्यावे आणि त्यानंतरच संबंधित पालक आणि मालक यांचेकडून सदर मुलाला/मुलीला बालकामगार म्हणून कामास न ठेवण्याबाबत समजपत्र लिहून घेण्यात यावी

 परिस्थितीमध्ये बदल घडतो की नाही, बालकामगार म्हणून त्याची कामापासून सुटका झाली का नाही याचा पाठपुरावा कृतीदलाकडे सोपविण्यात यावा. बाल कामगाराची मुक्तता न झाल्यास मात्र बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार हद्दीतील पोलीस ठाण्यात ग्रामसेवकाने तक्रार दाखल करावी.

१५