पान:बालबोध मेवा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालबोधमेवा. पु० २०. ज्यून, १८९२. अंक ६. "कां तर ज्यावर प्रभु प्रीति करितो, त्याला तो शिक्षा करितो; आणि ज्याला तो अंगीकारितो अशा प्रत्येक पुत्राला फटके मारितो." इब्री अ० १२ ओं० ६. आदामाख्यान. आर्या-गीति. प्रारंभी देवाने । पृथ्वी, आकाश यांस निर्मियले ।। सृष्टगुत्पत्तीचे ते । साहा दिवसांत काम संपविलें ॥ १ ॥ मग घडिला जगदीशे । पहिला माणूस मातिपासुनियां ।। जिववान् त्यास केलें। जीवाचा श्वास नाकि फुकुनियां ।।२।। पूर्वेस एदनामधिं । देवाने एक बाग लावियला ।। अत्यद्भुत सुंदर तो । पहिला माणूस त्यांत ठेवियला ।।३।। त्या बागाच्या मध्ये । जिवनाचे झाड लाविले होते ।। आणिक तसेच दुसरें । उत्तम वाईट जाणण्याचे ते ।।४।। सदसज्ञत्वाच्या तरु-। वरचे फळ भक्षितां तुह्मां मरण ।। येईल, देव रायें | सांगितले की तुह्मां असो स्मरण ।। ५।। परमेश्वरदेवाने । जितके पशुपक्षि निर्मिले हो ते ।। नांवे देण्यासाठीं। आदामापार्शि आणिले होते ॥ ६ ॥ आदामाने तेव्हां । पशुपक्ष्यादिकांस ठेविली सारी ।। नावें तींच तयांची। झाली परित्या मिळे न सहकारी ॥७॥ श्लोक-शा०वि०. आदामावरि गाढ झोप प्रभुने सांगे तयीं लोटली ॥ जेव्हां पूर्णपणे सुनिद्रित असे तो फांसळी घेतली ।। तीची स्त्री करुनी तयास दिधलीं नामें हवा तत्वतां ।। स्त्रीपाशीं नर हा जडेल ह्मणुनी त्यागोनि मातापिता ।।८।। आर्या-गीति. देवे जे जे प्राणी । होते निर्मीयले तयांमाजी ॥ चतुरख सर्प होता । त्याने केलेच कृत्य ते पाजी ॥९।। आदाम व हवा यांस एदेन बागेतून लावणे. श्लोक-भुजंग. कुधी सर्प तो बोलिला त्या स्त्रियेशीं ॥ खरे काय तुह्मां नसे खावयासी ? ।। हवा ते ह्मणे देवरायें अह्मांसी ।। दिली रे तरूंची फळे खावयासी ।। १० ॥