पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मध्य, मोक्ष हे कसे होतात, हें समजेल. पत्रा थेट पश्चि मेकडून पूर्वेस न नेतां प्रथम थोडासा उत्तरेस किंवा दक्षि- णेस नेऊन मग पूर्वेस न्यावा. ह्मणजे, कंकणाकृति किंवा खग्रास ग्रहण मुळींच न होतां खंडग्रहण कसें होतें, आणि स्पर्श व मोक्ष थेट पश्चिमेस किंवा पूर्वेस न होतां थोडेसे उत्तरेस किंवा दक्षिणेस कसे होतात, हें समजेल. वस्तुतः सूर्यापेक्षां चंद्र लहान आहे. तरी तो आप- ल्यास सूर्याहून फार जवळ आहे, ह्यामुळे दोघांची विवें आपल्यास बहुधा सारखींच दिसतात. पृथ्वीभोंवतीं चंद्र दीर्घ वर्तुलमार्गानें फिरतो त्यामुळे त्याचें पृथ्वीपासून अंतर नेहमीं सारखें नसतें, कमजास्त होतें. तो जवळ असतां जेवढा दिसतो त्यापेक्षां, दूर जातो तेव्हां लहान दिसतो. ह्यामुळें तो सूर्यवित्रापेक्षां कधीं किंचित् लहान दिसतो, आणि कधीं किंचित् मोठाही दिसतो. दिसत असतां तो थेट सूर्याच्या आड आला ह्मणजे कंकणग्रहण होतें; आणि मोठा दिसत असतां आड आला ह्मणजे खग्रास होतें. चंद्रग्रहण कधींही कंकणाकृति होत नाहीं. लहान ● सूर्यग्रहण कधीं कधीं कंकणाकृति होतें ही गोष्ट आ- मच्या प्राचीन ज्योतिप्यांस माहीत होती. रोमेशसिद्धांत नामक एक प्राचीन ज्योतिषग्रंथ आहे, त्यांत ह्मटलें आहे: तत्रेंदोरधिके सूर्ये कंकणग्रहणं स्मृतम् ॥ ४ ॥ ग्रहयुत्यधिकार. - अर्थ. - त्यांत ( सूर्यग्रहणांत ) चंद्राहून सूर्य मोठा असला तर कंकणग्रहण होतें.