पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५

ग्यांबिया देश, ह्यांतून जाते. सेनिग्यांबियाच्या पश्चिम- किनाऱ्यावर सूर्योदयानंतर थोड्याच वेळानें हें ग्रहण लागलेंसें दिसेल. परंतु तेथें सकाळचे ७ वाजतात तेव्हां मुंबईस दोनप्रहरचा एक वाजतो ! !
 चंद्र आणि सूर्य हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातातसे जरी दिसतात, तरी चंद्राची खरी गति व पृथ्वीच्या वार्षिक प्रदक्षिणेमुळे होणारी सूर्याची गति पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. त्यांत सूर्यापेक्षां चंद्राची गति फार जास्त आहे. ग्रहण लागण्यापूर्वी सूर्याच्या पश्चिमेस चंद्र असतो. परंतु तो जलद चालणारा असल्यामुळे सूर्याचें बिंव ओलांडून कांहीं वेळानें सूर्याच्या पूर्वेस येतो. पश्चिमेकडून चंद्र येतां येतां सूर्याच्या पश्चिमकडेच्या आड तो येतांच सूर्यास त्या दिशेनें ग्रहण लागूं लागतें. तेव्हां ग्रहणाचा स्पर्श झाला असें ह्मणतात. अर्थात् सूर्यग्रहणाचा स्पर्श सूर्य- बिंबाच्या पश्चिमेकडून होतो, आणि पुढे सूर्यबिंबाचा अधि- काधिक भाग आच्छादित होऊं लागतो. वेळानें तो कमी व्हावयास लागून सूर्याच्या पूर्वबाजूने चंद्र सूर्यास मोकळा करितो; ह्मणजे ग्रहण सुटतें; त्या वेळी ग्रहणाचा मोक्ष झाला असें ह्मणतात. मोक्ष ह्याचा अर्थ सुटका असा आहे. सूर्यग्रहणाचा मोक्ष पूर्वेकडे होतो. बिंबाचा जितका भाग आच्छादित होतो, तितका ग्रास झाला असें ह्मणतात. स्पर्शापासून मोक्षापर्यंत जो काळ जातो त्यास पर्वकाळ ह्मणतात. या कालच्या मध्याच्या सुमारास महत्तम ग्रास होतो, तेव्हां ग्रहणाचा मध्य झाला असें ह्मणतात. त्या वेळीं जो भाग आच्छादित होतो, तो ग्रास पंचांगांत लिहितात, आणि आकृतीत दाखवितात. ग्रास