पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६


होईल, अशी आशा आहे. वेळ सत्कार्थी खर्चावा, एवढेंच सांगणें आहे.

फोनोग्राफ.

 आपण एकाद्या भांड्यावर ठोका मारिला की, त्यांतून नाद निघू लागतो; आणि असा नाद होत असतांना त्या भांड्याच्या कांठास जर हळूच स्पर्श केला, तर तो कांपतो आहे – लवकरलवकर मांगेंपुढे होत आहे — असें समजतें. अशा कांपणाऱ्या कांठास आपण जरा दाबून हात लाविला कीं त्याचा कंप बंद होतो, आणि त्याबरोबरच तो नाद निचण्याचेंही बंद होतें. ह्या सुलभ प्रयोगावरून, त्या भांड्याचा कंप आणि ऐकूं येत असतो तो नाद ह्यांचा निकट संबंध आहे, आणि कंप हा नादाचें कारण आहे, असे वाटू लागतें. आणि तेंच खरें आहे. त्या भांड्याच्या कंपामुळे त्याच्या जवळची हवा कांपूं लागते; तो कंप हवेंतून पसरत जाऊन आपल्या कानांत त्याचे सूक्ष्म आघात होतात; आणि तेणेंकरून कर्णेद्रियास ध्वनीचा भास होतो. आतां, हवेंत कसा कंप होत असेल तो समजण्यास, पाण्याने भरलेल्या भांड्यावर ठोका मारून पहावा. तो ठोका मारितांच जसा त्या पाण्यांत कंप उत्पन्न झालेला दिसतो, त्याच प्रकारचा कंप त्या भांड्यास लागून असलेल्या हवेंत उत्पन्न होतो. हवा काढून टाकिलेल्या भांड्यांत जर एकादी घंटा वाजविली, तर तिचा नाद ऐकू येत नाहीं. कारण त्या घंटेचा कंप कानापर्यंत पोंचविण्यास दरमियान कांहीं वाहन नसतें.

 ज्या वस्तूचा कंप सावकाश होतो, तिजपासून नीच ध्वनि निघतो, व ज्या वस्तूचा कंप त्वरेनें होतो तिजपासून