Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ लोक काय बोलतात. येथील युनिव्हर्सिटीच्या परीक्षांची फी वाढेल असा रंग दिसतो. विंचवाचा दंश झाला तर त्या जागीं केरोसीन तेल चोळावें ह्मणजे तो उतरतो असें ह्मणतात. रशियाचे शाहाजादे हिंदुस्थानांत हिंडत आहेत. त्यांची तब्यत आमच्या सरकारास फार संभाळावी लागते. दिल्लीस असतांना त्यांनीं तन्हतऱ्हेच्या जिनसा, खेळणीं वगैरे वीस हजार रुपयांचीं विकत घेतलीं ! ! ! रस्त्यांतून जाणाऱ्या बायकांच्या आंगावर उड्या घालून त्यांच्या खिशां- तलीं घड्याळें वगैरे काढून नेण्यास एका अमेरिकेंतल्या माणसानें एका माकडास शिकविलें होतें. त्या माणसास धरून शिक्षा दिली. पारिसशहराच्या एका गल्लीत राहणारा माणूस रात्रीच्या वेळेस रस्त्यांत बारीक तारा आडव्या बांधून ठेवी आणि त्यांत जे लोक अडखळून पडत, त्यांस येऊन लुबाडीत असे. ह्या मानवी कोळ्याला शिक्षा झाली आहे. हिंदुस्थानांत, सेव्हिंग्जब्यांका ६५४६ आहेत त्यांत ४३१८४० लो- कांचे पैसे आहेत; त्यांस गतवर्षी एकंदर व्याज २७१९०५७ रुपये मि- ळाले; आणि त्यांची सगळ्यांची मिळून शिल्लक ७५४१७२१३ रुपये होती. मुंबईशहरांत बिलंदर भामटेलोकांच्या टोळ्यांचें प्राबल्य फारच वाढलें आहे. त्यांतले लोक, कोणी पेढीवाल्याचें, कोणी दुकानदाराचें कोणी शि पायाचें, अशीं सोंगें घेऊन लोकांस फसवीत आहेत, तरी पोलीस स्वस्थ आहे. परंतु ज्या पोलिसास कोनाकोपऱ्यांतले गुन्हे शोधून काढितां येतात, त्यास ह्या ढवळ्यादिवसा चाललेल्या चोऱ्यांचा पत्ता लावतां येऊं नये काय ? इंग्लंडांतल्या ल्यांक्याशायर प्रांतांत कापसाच्या गिरण्या अतिशयित आहेत. त्या सर्वोत मिळून दररोज सरासरी १५५,०००,००० मैल लांब सूत तयार होतें. परंतु आपल्या आकाशांतला पृथ्वीला सर्वात जवळचा स्थिर तारा इतका दूर आहे कीं, सगळ्या ल्यांकाशायरमधल्या गिरण्या ४०० वर्षेपर्यंत जेव्हां एकसारखें सूत काढितील तेव्हां तो धागा पृथ्वीपासून या स्थिर ताऱ्यापर्यंत पोंचण्यापुरता लांब निघेल.