पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६० ऊन, हे गुण ज्या लोकांमध्यें कमी असतात त्यांस मागें टाकितात, आणि आपले सेवक बनवितात; आणि त्या बिचाऱ्यांस आपले आयुष्य त्यांत कंठावें लागतें. आणि मग ते हळूहळू नाहींतसे होऊं लागतात. ह्याचें ढळढळीत उदाहरण आपल्या डोळ्यांपुढे दिसत आहे. ह्मणून आपल्या समाजाची स्थिति सुधारण्याची कळकळ ज्यांस खरोखर असेल, त्यांनीं त्या समाजांत, हे वर निर्दिष्ट के- लेले आवश्यक गुण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसा प्रयत्न जर वेळींच झाला नाहीं, तर, युरोपांतल्या मू- ळच्या काळ्या उंदरांची जी स्थिति झाली ह्मणून वर सां- गितली आहे, ती स्थिति आमची होईल, अशी भीति आहे. ह्मणून सावध व्हावें. ग्रीक लोक. प्राचीन इतिहासामध्यें ग्रीस देशाचा इतिहास अत्यंत अवलोकनीय आणि अत्यंत बोधप्रद समजतात. आणि ख- रोखरच, तितका मनोरंजक आणि तितका सुविचारप्रचुर इतिहास दुसरा नाहीं. तो इतिहास इ० स० पूर्वीच्या १८९६ व्या वर्षापासून तो इ० स० पूर्वीच्या १४६ व्या वर्षापर्यंत इतक्या मुदतीचा, ह्मणजे सुमारें १७०० वर्षीचा आहे. तेव्हां त्या राष्ट्राची लांबी ४०० मैल होती, आणि रुंदी १५० मैल होती. एवढ्याशा प्रदेशांत त्या सत्राशें वर्षांमध्ये अशा कांहीं गोष्टी घडल्या कीं, सध्याची मोठ- मोठीं विद्याचारसंपन्न राष्ट्र, त्या गोष्टींपासून बोध घेऊन आपलीं राज्य चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. उत्तम राज्यव्यवस्थेची मूलतत्त्वें अगदी प्रथमारंभी ग्रीक