पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५९

तील माशा आल्यामुळे तेथल्या मूळच्या माशा नाहींतशा झाल्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टींचें कारण एक आहे. तें हैं कीं, जे प्राणी विद्यमान आहेत, त्यांचे ठायीं, जे प्राणी नष्ट झाले आहेत त्यांच्या आंगच्यापेक्षां, शरीरबल, आ- पलं भक्ष्य मिळविण्याचें सामर्थ्य, आपल्या शत्रूचा नाश करण्याचें बळ, आणि वाज्यापावसास दाद न देण्याचें बळ, हे गुण अधिक आहेत. जीवनार्थ कलह जेथें जेथें चालला आहे, तेथें हाच प्रकार विद्यमान आहे.
 असा हा जीवनार्थ कलह सगळ्या पृथ्वीभर चालला आहे. ह्या कलहांत जे प्राणी आणि ज्या वनस्पति जय पावून वांचतात, ते प्राणी व त्या वनस्पति, ह्यांचे ठायीं शक्तीचा, शत्रु टाळण्याचा, कपटाचा आणि प्रजोत्पत्तीचा गुण अधिक असल्यामुळे वांचतात. आणि तेणेंकरून ही सृष्टि आपल्या डोळ्यांस शांत, रमणीय, आणि तेजस्वी दिसते. हा जीवनार्थ कलह इतर प्राण्यांत आणि वनस्प तींत चालू आहे, त्या रीतीनें माणसांत चालू नाहीं. मा- णसांतला जीवनार्थ कलह कांहीं वेगळ्या प्रकारचा आहे. कां कीं, त्यांस विचारबुद्धि आहे, आणि कायदे आहेत; त्यांच्या योगानें, "बळी तो कान पिळी" ह्या तत्त्वाचा लोप त्यांच्या बहुतेक व्यवहारांत झाला आहे. त्यांस केवळ आपल्या शक्तीच्या जोरावर एकमेकांस लुबाडतां येत नाहीं, की तुडवितां येत नाहीं. परंतु, दुसऱ्या एका प्रकारानें त्यांच्यांत जीवनार्थ कलह चालला आहे. तो, बुद्धिमत्ता, चातुर्य, काम करण्याची शक्ति, जुटीनें काम करण्याची इच्छा, इत्यादि गुणांवर चालला आहे. हे गुण ज्या लो- कांत विपुल असतात, ते लोक धनवान आणि सुखी हो-