पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ परमेश्वराची प्रार्थना करीत असतो. त्या प्रार्थनेप्रमाणें तो कृपासिंधु आमचे मनोरथ पूर्ण करीत आहे. त्यांत जे पुरुष विद्यमान आहेत, त्यांमध्यें फेरोजशाहा मेरवानजी मेहता हे थोर गृहस्थ आहेत. त्यांचें संक्षिप्त चरित्र आह्मी येथें सादर करितों. फेरोजशाहा मेरवानजी मेहता ह्यांचे आजे व्यापारी होते; आणि त्यांचे वडीलही व्यापारच करीत असत. परंतु, वडिलांस ग्रंथावलोकनाची अभिरुचि चांगली होती. आणखी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांस व्हावा, अशी त्यांची फार इच्छा असे. तेणेंकरून, भूगोलविद्या, रसा- यनशास्त्र, इत्यादि अनेक विषयांवर त्यांनीं कितीएक पु- स्तकें लिहिलीं. तीं विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडलीं. फे- रोजशाहा हे इ० स० १८४५ च्या आगष्ट महिन्यांत जन्मले. लहानपणी थोडासा अभ्यास गांवठी शाळांत के- ल्यानंतर ते एलफिन्स्टन हैस्कुलांत गेले. त्यांची म्या- ट्रिक्युलेशनची परीक्षा इ० स० १८६१ ह्या वर्षी उतरली. नंतर ते एलफिन्स्टन कालेजांत जाऊं लागले. तेव्हां त्या कालेजाचे प्रिन्सिपाल सर अलेक्झांडर ग्रांट हे विद्वान गृ हस्थ होते. त्यांचा फार आवडीचा विषय ह्मटला ह्मणजे इतिहासशास्त्र हा होता; आणि फेरोजशाहा हे त्या वि- षयांत चांगले प्रवीण होते. तेव्हां त्यांजवर ग्रांटसाहे- बांची विशेष मर्जी बसली, ह्यांत कांहीं विशेष आश्चर्य नाहीं. विषयाच्या आवडीचा आणि प्रेमाचा हा प्रकार कांहींसा स्नेहाकर्षणासारखा आहे. इ० स० १८६४ ह्या वर्षी फेरोजशाहा बी. ए. झाले, आणि लागलेंच त्यांस त्या कालेजांत फेलो नेमिलें. पुढे लागलीच साहा महिन्यांनीं ●