पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ माणसांसारखे असतात. ते आकाशांत उडतात तेव्हां हे इतके प्राणी वर चालले आहेत की काय असे दिसतें. शिवाय त्यांस लहान लहान कंदील बांधीत असतात. ते वर गेले ह्मणजे ताऱ्यांप्रमाणें चकाकतात. . पतंग उडविण्याचा हा त्यांचा एक ऋतु असतो. त्यास आरंभ त्यांच्यांतल्या नवव्या महिन्याच्या नवव्या ति थीस करण्याचा परिपाठ प्राचीन काळापासून पडला आहे. त्याचें मूळ असें सांगतात कीं, एके वेळेस एका माणसास जोश्यानें असें भविष्य सांगितलें कीं, तुझ्या कुटुंबांत अ- मक्या महिन्याच्या अमक्या तिथीस कांहीं मोठा अनर्थ होईल. तें त्याला खरें वाटून तो मनुष्य, तो अनर्थ टा ळण्याच्या आशेनें, आपल्या सगळ्या मुलांमाणसांसहव- र्तमान डोंगरांमध्यें वनभोजनास गेला. तिकडे त्याला कांहीं संकट आलें नाहीं. परंतु, घरी येऊन पाहूं लागला तों त्याच्या गोठ्यांतली सगळीं गुरें मेलेलीं त्याच्या दृष्टीस प डलीं. तो दिवस नवव्या महिन्याच्या नवव्या तिथीचा होता. तेव्हांपासून त्या दिवशीं घरीं राहावयाचें नाहीं, आणि सगळ्या माणसांनीं अरण्यांत वनभोजनास जावयाचें, असा परिपाठ पडला आहे. आणि तो दिवस सगळी मं- डळी पतंग उडविण्यांत घालविते. - मुलगा पांच वर्षांचा झाला ह्मणजे सुमुहूर्त पाहून त्याला शाळेत घालतात. त्याला आधीं प्रथम देवळांत नेतात. तेथें, त्यांचा देव कान्फ्यूशियस, ह्यास धूपदीप करितात, मुलगा त्याच्या मूर्तीला तीन नमस्कार घालितो; आणि मग शाळेंत जाऊन, पंतोजीच्या पायांवर डोकें ठेवून अ भ्यासाला आरंभ करितो. त्यास बसायास बांक असतें,