कांततात तेव्हां उष्णता उत्पन्न होते. ह्यावरून, गतिरूप शक्तीचेंही रूपांतर उष्णतारूप शक्तींत होतें, असें झालें. आणि हा रूपांतराचा नियम सर्व शक्तींस लागू पडतो. विजेच्या योगानें यंत्रें चालतात, आणि गतीच्या योगानें वीज उत्पन्न करितां येते. एक यंत्र करितात; त्यांत, नालाच्या आकाराच्या एका मोठ्या लोहचुंबकाच्या ध्रुवांच्या दरम्यान एक तारांचें वेटोळें ठेविलेलें असतें; तें वेटोळें फिरविलें, ह्मणजे त्या तारांत वीज उत्पन्न होऊन तिच्या योगानें दिवा लावितां येतो, किंवा तार वितळवितां येते. आणि उलट, त्या तारांतून विजेचा प्रवाह पाठविला ह्मणजे, तें वेटोळें गरगर फिरूं लागतें ! दोन धातूंच्या दोन पट्टया जोडून जर एक कडें केलें, आणि त्यांतला एक सांधा ऊन केला, तर त्या कड्यांतून वाह वाहू लागतो. आणि अशाच कड्यांची नीट व्यवस्था करून जर एक ब्याटरी तयार केली, तर तिला लाविलेल्या उष्णतेचें रूपांतर होऊन बराच मोठा विद्युत्प्रवाह उत्पन्न होतो. वाफेच्या यंत्राच्या द्वारें उष्णतेचें रूपांतर विजेंत करितां येतें, हें सर्वोस माहीतच आहे.
कांहीं पदार्थ असे आहेत की, त्यांच्यावर प्रकाश पाडिला की त्यांतून ध्वनि निघूं लागतो - ह्मणजे, प्रकाशाच्या आंदोलनांचें (लाटांचें ) रूपांतर होऊन ध्वनीचें आंदोलन होऊं लागतें. तोफा सोडिल्या ह्मणजे जो ध्वनि उत्पन्न होतो, त्याच्या योगानें जवळच्या घरांच्या खिडक्यांचीं तावदानें वगैरे फुटतात हें माहीतच आहे.
ध्वनि, उष्णता आणि प्रकाश, ह्यांच्या मूळस्वरूपाचा