पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३


 शक्तीच्या ह्या प्रत्यक्ष स्वरूपाचीं व गुप्त स्वरूपाचीं दुसरीं पुष्कळ उदाहरणे आहेत. बंदुकीच्या पेटविलेल्या दारूची शक्ति प्रत्यक्ष आहे, आणि न पेटविलेल्या दारूची शक्ति गुप्त आहे; त्याचप्रमाणें कोळशांचें समजावें.

 घडघडत येतो त्या दगडाच्या स्थितीवरून असा प्रश्न सुचतो कीं, हा दगड घडघडत येण्याच्या पूर्वी जर त्या डोंगराच्या माथ्यावर नसता, किंवा दुसऱ्या एकाद्या उंच ठिकाणावर नसता, तर त्यांत अशी शक्ति उत्पन्न झाली असती काय ? उत्पन्न झाली नसती, हें उघड आहे. ह्मणजे, त्या दगडांत जी शक्ति आली, ती त्याच्या उन्नतस्थानामुळे आली. आणि, तें उन्नतस्थान त्याला मिळण्यास पूर्वी कांहीं शक्तीचा खर्च झाला असला पाहिजे. तो दगड इमारतीवरून निघून खालीं आला असला, तर पूर्वी त्याला मजूरांनी आपली शक्ति खर्चून वर चढविलें असलें पाहिजे; आणि तो दगड डोंगराच्या माथ्यावरून आलेला असला, तर, तो डोंगर उत्पन्न होण्यास प्राचीन काळीं धरणीकंपाची वगैरे जी शक्ति खर्च झाली असेल, तिच्या योगानें तो त्या माथ्यावर गेला असला पाहिजे. ह्मणजे, पूर्वी खचिलेली शक्ति त्या दगडांत गुप्त राहिली होती, आणि ती आतां व्यक्त झाली, एवढेंच कायतें; नवीन शक्ति उत्पन्न झाली नाहीं.

 कोळशाचीही गोष्ट तशीच आहे. ज्याप्रमाणें डोंगराच्या माथ्यावरच्या दगडास एकदां धक्का दिला कीं, तो गडबडां पडूं लागून त्यांतली शक्ति बाहेर पडूं लागते, त्याप्रमाणेंच कोळसा किंवा लांकडें हीं एकदां पेटविलीं कीं उप्णता उत्पन्न होऊं लागून, वाफेच्या यंत्राच्या योगानें तिजक-२