पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांच्या हातून, आमचे राज्यकर्ते आणि आह्मी प्रजाजन, ह्यांच्यामधलें सख्य वाढलें पाहिजे. त्याप्रमाणेंच नव्या मताचे लोक आणि जुन्या मताचे लोक ह्यांचा संधि यु- क्तीच्या पोटीं करून, त्यांचें सख्य वाढविलें पाहिजे. अशा प्रकारचीं जीं फार थोडी चांगली माणसें सध्या आम- च्यांत आहेत, त्यांतलेच गोविंदराव रामचंद्र गरुड हे गृहस्थ आहेत. त्यांचें संक्षिप्त चरित्र आह्मी येथें सादर करितों. - ह्यांच्या पूर्वजांचें मूळचें राहण्याचें गांव पैठण होय. ह्यांचे पूर्वज मोंगलाई अमल असतां नगरास मोठ्या हु- द्याचे कामावर आले, आणि तेथें त्यांचें राहाणें बरेच वर्षे झालें. पुढें कर्नल ब्रिग्ज् हे इंग्रज सरकारचा अमल बसविण्याकरितां खानदेशांत आले त्या वेळी त्यांनी आप- णांबरोबर जे विश्वासू कामगार लोक आणिले होते, त्यां- मध्यें रामचंद्रराव गरुड हे होते. ह्यांना अगदी प्रथमचे दप्तरदार आप्पाराव ह्यांचे हाताखालीं नायब दप्तरदार ने- मिलें. तेव्हांपासून त्यांचें राहणें धुळे येथें झालें. त्या रामचंद्ररावांचे चवथे चिरंजीव गोविंदराव गरुड हे होत. ह्यांचें जन्म, इ० स० १८३० ह्या वर्षाच्या मे महिन्याच्या तिसाव्या तारखेस धुळे येथें झालें. ह्यांचे बाळपणाचे वेळीं विद्याभ्यासाची साधनें फारशी नव्हतीं. ह्मणजे, स- रकारी शाळा नव्हत्या. ह्मणून गांवठी शाळेंत ह्यांनीं लि- हिणें, वाचणें, हिशेब करणें ह्यांचा चांगला अभ्यास केला. पुढे ह्यांना इंग्रेजी शिकण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण त्यांनीं इंग्रेजी भाषेचा अभ्यास शाळेत जाऊन केला नाहीं. स्वतः घरीं मेहेनत करून त्यांनीं त्या भाषेचें ज्ञान संपादिलें. तरी ह्यांना इंग्रेजी चांगलें समजतें. तें ●