पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क रव ग़ घ आ ह्या सपाट आरशावर जर क व ख हे समांतर किरण पडले, तर ग व घ हे परावर्तन झालेले किरण क व ख सारखेच समांतर राहातील. आतां फांकलेले किरण ध्या. द ह्या दिव्यापासून आ दक व द ख किरण आआ आ रशावर पडले आहेत, आणि क म व ख फ हे त्यांचे परावर्तन झालेले किरण आहेत. आरसा नसता तर आ दक व द ख किरण सरळ जाऊन जितके फांकले असते तितकेच क म रव आ व ख फ हे किरण फांकलेले आहेत. तसेंच, कम वख फ ह्या किरणांच्या रेषा जर आरशाखालीं वाढविल्या, तर त्या 'द' ह्या बिंदूंत, द दिवा आरशाच्या वर जितक्या अं तरावर आहे तितक्याच अंतरावर आरशाच्या खालीं, येऊन मिळतील. ह्मणजे, क म व ख फ हे किरण दि- व्यापासून सरळ आलेले असते, तर तो दिवा 'द' येथें अ- सला पाहिजे होता. ह्या विवेचनावरून, आरशांत प्रतिमा कां दिसतात, व मूळवस्तु आरशापासून जितकी दूर अ सते तितक्याच अंतरावर आरशाखालीं ती आहेशी कां वा- टते तें, स्पष्ट होण्यासारखे आहे. आपल्या डोळ्यांला सरळ रेषांनीं मात्र पाहाण्याची संवय असल्यामुळे कम व खफ हे किरण, 'द' जागेपासून आले आहेत असा भास होतो. एका आरशावर दुसरा एक आरसा उभा धरून त्यां- च्यामध्यें जर एकादी वस्तु धरिली, तर, तिच्या तीन प्र