पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

को. टिळक मंच संत्रालप, वाई, १३५ तींत तिच्या पुढच्या पदार्थांची प्रतिमा दिसते, त्या वस्तूस आरसा ह्मणावें. उत्तम प्रकारचा आरसा ह्मटला ह्मणजे, त्याचा किरण परावर्तन करणारा पृष्ठभाग उत्तम जिल्हईचा असून, तो एकच असला पाहिजे. कांचेच्या आरशांत ह्यांतली प- हिली गोष्ट चांगली साधलेली असते. परंतु दुसरी गोष्ट चांगली साधत नाहीं. कारण, कांहीं केलें तरी त्याचे प- रावर्तन करणारे दोन पृष्ठभाग राहातात; एक खुद्द कांचेचा वरचा पृष्ठभाग, आणि दुसरा त्या पृष्ठभागाखालचा पा- या दोन्ही पृष्ठभागांवर किरणांचें परा- ज्याचा पृष्ठभाग. वर्तन होऊन निरनिराळ्या प्रतिमा दिसतात. ह्मणून, शास्त्रीय प्रयोगांमध्यें उपयोग करावयाचे आरसे लोखं- डाला जिल्हई देऊन केलेले असतात. त्यांचा परावर्तन करणारा पृष्ठभाग एकच असतो ह्मणून त्यांत जास्त प्रतिमा दिसत नाहींत. कधीं कधीं उथळ भांड्यांत भरलेल्या पा- ज्याचाही उपयोग आरशाप्रमाणे करितात. ● आरसे दोन प्रकारचे असतात. सपाट आरसे व वक्र आरसे. आपले नेहमींचे पाहाण्याचे आरसे, ते सपाट आरसे होत. दिव्यांच्या मागें, जास्त उजेड पडण्यासाठी, ज्या तबकड्या लावतात, ते अंतर्वक्र आरसे होत; आणि बाजारांत जे पारा लावलेले कांचेचे गोळे मिळतात, ते बहिर्वक्र आरसे होत. ● - सपाट आरसे. – सपाट आरशांवरून किरण पराव- र्तन पावतात तेव्हां त्या किरणांची दिशा मात्र बदलते; ते मूळचे समांतर किंवा फांकलेले असले तर परावर्तन झालेले किरणही तसेच समांतर किंवा फांकलेले राहतात.